मुंबई, 8 मार्च- आज 8 मार्च, जागतिक महिला दिन जगभऱात उत्साहात साजरा केला जात आहे. आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिनं देखील तिच्या मैत्रिणींना खास अंदाजात महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण महिला वर्गासाठी मधुराणीनं एक कविता वाचून दाखवली आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मधुराणी प्रभुलकर आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीची भूमिका साकाताना दिसते. ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचे कथानक अरुंधती फिरताना दिसते. महिला वर्गात अरुंधीतीची क्रेझ पाहायला मिळते. या भूमिकेला मधुराणीला एक वेगळी ओळख दिली आहे. आज कुठे ना कुठे महिला अरुंधतीमध्ये स्वत: ला पाहताना दिसतात. तिच्या आयुष्यात तिला खूप संघर्ष करावा लागला. सर्व परस्थितीवर मात करून अरुंधती स्वत: च्या पायावर उभी आहे. वाचा- अंकिता लोखंडेने दिली होळीची जंगी पार्टी; बेभान होऊन रंग खेळताना दिसली अभिनेत्री आज महिला दिनानिमित्त मधुराणीनं अशीच एक कविता सादर केली आहे. तिनं यासोबत पोस्ट लिहित म्हटलं आहे की, माझ्या सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!संजीवनी बोकील ह्यांची माझी अतिशय लाडकी कविता खास तुमच्यासाठी. कुणी नसलं तरी चालेल..तुझी तू रहा… मधुराणीच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एकानं म्हटलं आहे की,वाह वाह! शब्द नाहीत माझ्या कडे तारीफ करायला.. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की,ता आहे ही❤️❤️ आणि ते ही तुमच्या आवाजात ऐकली तर अजूनच जास्त छान वाटते ❤️😍 तुम्हाला ही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा😍❤️ आणि आमच्या लाडक्या अरुंधती ताई ला पण महिला दिनाच्या खूप खूप सदिच्छा❤️😍..अशा अनेक कमेंट मधुराणीच्या या व्हिडिओवर आल्या आहेत.
मधुराणी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती उत्तम कवित सादर करते हे चाहत्यांना माहित असेलच. ती अनेकवेळा तिच्या कविता सदीकरणाच्या कार्यक्रमाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्य़ांनसोबत शेअर करत असते. शिवाय ती उत्तम गाते देखील, तिला गायनाची देखील आवड आहे. म्हणून तिनं तिच्या मुलीचं नाव स्वराली ठेवलं आहे.
सध्या आई कुठे काय करते मालिका एका वेगळ्या ट्रॅकवर आहे. मालिकेत आईच म्हणजे अरुंधतीचं लग्न आहे. देशमुख परिवार लग्नाच्या लगबगीत आहे. अनिरुद्ध नेहमीप्राणे काड्या करताना दिसत आहे. संजनाच्या वागण्यात बदल झालेल्या दिसत आहे. प्रेक्षकांनी देखील हा बदल स्वीकारला आहे. आता आशुतोषसोबत अरुंधती नवीन संसार थाटणार आहे. प्रेक्षक देखील अरुंधतीचा हा नवा प्रवास पाहण्यासाठी उत्सुक आहेत.