मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /डोक्याला घासून गेलं हेलिकॉप्टर अन् बंद झाला श्वासोच्छवास, 'तो' सीन करताना थोडक्यात वाचला होता शाहरुख

डोक्याला घासून गेलं हेलिकॉप्टर अन् बंद झाला श्वासोच्छवास, 'तो' सीन करताना थोडक्यात वाचला होता शाहरुख

shahrukh khan

shahrukh khan

एका सिनेमाच्या चित्रीकरणावेळी शाहरूखला त्याचा जीव गमवावा लागला असता. पण वेळ चांगली होती म्हणून तो त्यातून सुखरूप बाहेर पडला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 मार्च- बॉलिवूडचा किंग अशी ओळख शाहरूख खानची आहे. बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये शाहरुखचं नाव आहे. शाहरूखचा चाहता वर्ग फक्त देशातच नाही तर जगभरात आहे. जगभरात त्याच्यावर प्रेम करणारे असंख्य चाहते आहे. शाहरूखच्या सिनेमात अनेक अॅक्शन सीन असतात. बरेच कलाकार सीन डब करतात मात्र शाहरूख त्याच्या सिनेमात सगळे अॅक्शन सीन स्वत: करतो. असाच एक किस्सा आहे जो त्याच्या कोयला या सिनेमाशी संबधीत आहे. हा किस्सा खूपच भयंकर आहे. या सीनमुळे शाहरूखचा जीव जाता -जाता वाचला. जरा जरी उशीर झाला असता तर शाहरूखला त्याचा जीव गमवावा लागला असता. शाहरूखची वेळ चांगली होती म्हणून तो यातून सुखरूप बाहेर पडला.

शाहरूख त्याच्या प्रत्येक सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसतो. भूमिका कोणतेही असो तो त्याला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो.मात्र मागच्या काही दिवासात त्याचे सिनेमे प्रेक्षकांचं म्हणावं तसं मनोरंजन करत नव्हते. लोकांना वाटू लागलं होतं की, शाहरूखचं करिअर आता संपलं आहे. मग काय शाहरूखनं पुन्हा नव्या दमानं पठान सिनेमातून कमबॅक केलं. या सिनेमानं दाखवून दिल की, आजही बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आहे. पठान सिनेमानं बॉ़क्स ऑफीसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. हे सर्व त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. तो आपल्या चित्रपटांसाठी किती मेहनत घेतो, याचा पुरावा त्याच्या 'कोयला' या चित्रपटातून मिळू शकतो. या चित्रपटातील एका सीनमध्ये शाहरुखचा जीव गेला असता. खरं वेळ चांगली होती त्यामुळे तो वाचला. चित्रपटाच्या टीमनं सर्व काही व्यवस्थित हाताळले आणि शाहरुखचा जीव वाचला.

वाचा-संपूर्ण टीमसमोरच नूतनने 'या' सुपरस्टारला मारलेली कानाखाली, धक्कादायक होतं कारण

शाहरुखच्या डोक्याला घासून गेलं होतं हेलिकॉप्टर

शाहरूख कोयला चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. चित्रपटात एक अॅक्शन सीन शाहरूख खानवर शूट केला जात होता. एका मुलाखती दरम्यान शाहरूखन याबद्दल सांगितलं होतं. शाहरुखने या चित्रपटात शंकरची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या एका सीनमध्ये शाहरूखचा पाटलाग हेलिकॉप्टर करत असते. या सीनमध्ये हे हेलिकॉप्टर त्याच्या डोक्यावरून जाणार होते पण पायलटच्या चुकीमुळे ते शाहरुखच्या एकदम डोक्याच्या जवळून गेलं. जरकमी यामुळे शाहरूखचा जीव गेला असता. थोडीशी चूर पण त्याला जीव गमवावा लागला असता. यामुळं शाहरुख जखमी झाला आणि खाली पडला आहे. पण त्याला फारशी इजा झाली नाही.

थोडक्यात वाचला शाहरूख

एवढचं नाही तर चित्रपटातील आणखी एक सीन शाहरूखच्या जीवावर बेतला होता.चित्रपटातील एका सीनमध्ये शाहरुखला आपल्या शरीराला आग लावून पळायचे होते. पण हा सीन करत असताना जेव्हा त्याच्या शरीराला आग लावली आणि आगिनं अचानक भडका घेतला. सहसा स्टंटमन हे करतात, पण शाहरुखने हा सीन स्वत: केला. मात्र शाहरुख खानने फायरप्रूफ कपडे घातले होते आणि चेहऱ्यावर वॉटर जेल होते. या वॉटर जेलचा प्रभाव फक्त 15 सेकंद टिकतो. शाहरुख खानला आगीच्या ज्वाळांनी वेढले होते. आगीच्या ज्वाळा इतक्या भडकल्या की, त्या नियंत्रणाबाहेर गेल्या.

शाहरूखनं त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, आग विजायचं नाव घेत नव्हती आणि मग मी जमीनवर कोसळलो. सगळे लोक आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. काही लोकांनी माझ्यावर ओले ब्लँकेट फेकले. तेवढ्यात एका मुलाला दिसलं की आग शाहरूख चेहऱ्याकडं जात आहे. त्यांने शाहरुखच्या चेहऱ्यावर कार्बन डायऑक्साईड शिंपडलं. एका मिनिटासाठी शाहरुख खानचा श्वास थांबला होता. तो काळ त्यांच्यासाठी खूप भीतीदायक होता.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Sharukh khan