ट्रेण्ड ब्रीज, 13 जून- इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपने चाहत्यांची निराशा केली आहे. पावसामुळे आतापर्यंत तीन सामने रद्द झाले तर भारत-न्यूझीलंड सामनासुद्धा पावसामुळे अद्याप सुरू झालेला नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातही पावसाची रिमझिम सुरू असून आता सामना कधी सुरू होईल सांगता येत नाही. गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी पाऊस पडत आहे. एकीकडे क्रिकेट चाहत्यांना आजचा सामना सुरू होणार की नाही याची चिंता सतावत असताना सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी याबद्दल मीम तयार केले आहेत. यात आता फक्त बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच पावसापासून हा सामना वाचवू शकते असंही म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर अशा पोस्टचा अक्षरशः पाऊस पडला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
Priyanka comes to the rescue of cricket fans...#INDvNZ pic.twitter.com/KVmVDzw3Q9
— Burning Chinar (@BurningChinar) June 13, 2019
याशिवाय आयसीसीलासुद्धा यंदाच्या वर्ल्ड कप नियोजनाबद्दल ट्रोल केलं जात आहे. पावसामुळे आतापर्यंत तीन सामने रद्द करावे लागले. याचा श्रीलंकेला दोन सामन्यात फटका बसला. तर बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांना एका सामन्यात पावसाने दणका दिला. यामुळे संघांना प्रत्येकी एक गुण दिला गेला. नॉटिंगहॅमवर पावसामुळे भारत न्यूझीलंडमधील नाणेफेक अद्याप झाली नाही. पाऊस थांबला असला तरी मैदानावरील पाणी काढण्यासाठी थोडा वेळ जाणार आहे. यानंतर पंच मैदानाची पाहणी करून पुढचा निर्णय घेतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये तीन सामने पावसामुळे वाया गेले आहेत. तर न्यूझीलंडने सर्वाधिक 3 सामने जिंकले आहेत. यासंदर्भातले मीमही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पावसाने जास्त सामने जिंकल्याचं यात म्हटलं जात आहे. इंग्लंडमध्ये बारमाही पाऊस पडतो. त्यामुळे तिथे इतर 9 संघांनी पावसाचा आनंद लुटण्यासाठी 4 वर्ष वाट पाहिली असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. पावसाची परिस्थिती पाहता पाण्याखाली सामने खेळावे लागतील असंही चाहत्यांनी म्हटलं आहे. एकूणच वर्ल्ड कपमधील रद्द होणाऱ्या सामन्यांमुळे चाहत्याची निराशा केली आहे.
SPECIAL REPROT : भारत करणार का किवींची शिकार? पण 'हे' विसरून चालणार नाही!
वाचा- पाऊस थांबला तरी मॅच होणार नाही ?, EXCLUSIVE बातमी
वाचा-…म्हणून वर्ल्ड कपमध्ये रिझर्व्ह डे नाही, आयसीसीनं दिलं पत्राद्वारे उत्तर
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा