प्रशांत बाग, प्रतिनिधी मुंबई, 19 मे : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या कॉर्डेलिया ड्रग्ज क्रूज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. आर्यन खानला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरूख खान आणि त्याच्या कुटुंबियांकडून 25 कोटी रुपये खंडणीची मागमी करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. या संबंधी तपास सुरू असताना समीर वानखेडे यांनी महत्त्वाची दिली आहे. समीर वानखेडे आणि शाहरूख खान यांच्यात अनेकदा बोलणं झाल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे त्यांचे व्हॉट्स अँप चॅट्सचे त्यांनी शेअर केलेत. न्यूज 18 लोकमतच्या हाती याची एक्सक्लुसिव्ह माहिती लागली आहे. शाहरूख खाननं समीर वानखेडे यांच्याकडे मुलगा आर्यन खानला सोडवण्यासाठी विनंती केल्याचं चॅटमधून समोर आलं आहे. या चॅटमध्ये शाहरूख खानने समीर वानखेडेंना म्हटलं आहे की, “मी एक बाप आहे आणि तुम्ही देखील बाप आहात. माझा मुलगा चुकला असेल पण त्याला सांभाळून घ्या. याबाबत आपल्याला काय करता येईल ते सगळं आपण करू”, अशी विनंती शाहरूखनं केली आहे. एकदा नाही तर शाहरूखनं अनेकदा अशाप्रकारची विनंती समीर वानखेडे यांना केली आहे. हेही वाचा -
Sameer Wankhede: शेवटच्या क्षणी जोडण्यात आलं शाहरुखच्या लेकाचं नाव, महागडी घड्याळे, फॉरेन ट्रिप्सबाबत काय म्हणाले वानखेडे?
अभिनेता शाहरूख खान हा प्रसिद्ध अभिनेता असला तरी तो एक बाप आहे आणि हाच बाप या चॅटमधून दिसत आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी बापाची धडपड दिसून येत आहे. मुंबई उच्च न्यायालयात शाहरूख आणि समीर वानखेडे याचे चॅट समोर आल्यानंतर मोठी घडामोड घडली आहे.
त्याचप्रमाणे महत्त्वाची एक बाब म्हणजे आर्यन खानला अटक करण्यात आली तेव्हा आरोपपत्रामध्ये आर्यन खानचं नाव आरोपी म्हणून होतं. सेक्शन 27 नुसार आर्यन खानवर चार्ज ठेवण्यात आला होता. मात्र त्यानंतर सादर केलेल्या आरोपपत्रामधून आर्यन खानचं नाव वगळण्यात आलं. ही संपूर्ण घडामोड 25-27मे दिवसात झाली होती. आता याबाबत आता कोणता खुलासा होणार हे अद्याप सांगता येणार नाही.
CBIने समीर वानखेडे आणि NCB मुंबई झोनच्या त्यांच्या दोन माजी कनिष्ठांविरुद्ध FIR देखील दाखल केली होती. या अहवालानुसार, वानखेडे आणि त्यांच्या कनिष्ठांनी ड्रग बस्ट प्रकरण हाताळताना नियमांचं पालन केलं नाही. आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांची नावे शेवटच्या क्षणी त्या एफआरआयमध्ये जोडण्यात आली होती. तर इतर काही संशयितांची नावे मूळ माहिती पत्रामधून वगळण्यात आल्याचा आरोप केला आहे.