जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / प्लास्टिक सर्जरीमुळे शाहिदच्या पत्नीची झाली ही अवस्था? जाड ओठ, सुजलेला चेहरा पाहून चाहते हैराण

प्लास्टिक सर्जरीमुळे शाहिदच्या पत्नीची झाली ही अवस्था? जाड ओठ, सुजलेला चेहरा पाहून चाहते हैराण

प्लास्टिक सर्जरीमुळे शाहिदच्या पत्नीची झाली ही अवस्था? जाड ओठ, सुजलेला चेहरा पाहून चाहते हैराण

अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतचा (Mira Rajput) व्हिडीओ पाहून अनेकजण चिंतेत पडले आहेत. ज्यात तिचे जाड ओठ दिसत आहेत तसेच सुजलेला चेहराही दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 24 जुलै : बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी प्लास्टीक सर्जरी (Plastic surgery), फेस ट्रान्सफॉर्मेशन या सगळ्या गोष्टी नव्या नाहीत. त्यात अभिनेत्री हा फारच आघाडीवर दिसून येतात. पण आता कोणतीही अभिनेत्री नाही तर प्रसिद्ध अभिनेता शाहीद कपूरच्या (Shahid Kapoor) पत्नीचा एक फोटो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. ज्यात तिच्या ओठांचा आणि चेहऱ्याचा आकार बदललेला दिसत आहे. अनेक सेलिब्रिटी स्वतःला आणखी सुंदर आणि वेगळं दिसण्याच्या इच्छेने प्लास्टीक सर्जरी, लिप फिलींग करतात. त्यामुळे यातच अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतचा (Mira Rajput) व्हिडीओ पाहून अनेकजण चिंतेत पडले आहेत. ज्यात तिचे जाड ओठ दिसत आहेत तसेच सुजलेला चेहराही दिसत आहे.

HBD: विदेशी असूनही Bold Look नापसंत; सलमानची कथित गर्लफ्रेंड म्हणूनही चर्चेत आहे Lulia Vantur

दरम्यान हा एक व्हिडीओ आहे जो मीराने इन्स्टाग्रामचं फिल्टर वापरून बनवला आहे. त्यामुळे तिचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून गेला होता.

जाहिरात

मीरा सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. अनेक प्रकारचे फोटो ती शेअर करत असते. तर व्हिडीओ देखील ती शेअर करते. अभिनेत्री नसली तरीही तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे. तर नेहमीच ती चर्चेत असते. तिच्या लुक्ससाठी ती फारच प्रसिद्ध आहे.

दोन मुलांची आई असलेली मीरा फारच फिट आहे. आपल्या फिटनेसवर ती फार लक्ष देते. कोणत्याही अभिनेत्री पेक्षा ती कमी नाही. 2015 साली शाहीद आणि मीरा यांनी दिल्लीत लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर त्याना मुलगी मिशा आणि मुलगा झेन ही दोन मुलं झाली. मीरा सिनेसृष्टीत सक्रीय नसली तरीही ती एक प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. तिने शाहीद सोबत एका मॅगझिनाठी फोटोशुटही केलं होतं. याशिवाय अनेक ब्रँड्ससाठी ती सोशल मीडियावर जाहीराती करतानाही दिसते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात