Home /News /entertainment /

Video: ही बॅटिंग पाहून आठवेल धोनी; पाहा शाहिद कपूरचा धमाकेदार शॉट

Video: ही बॅटिंग पाहून आठवेल धोनी; पाहा शाहिद कपूरचा धमाकेदार शॉट

अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात तो क्रिकेट खेळताना दिसत आहे.

  मुंबई 6 ऑगस्ट :  क्रिकेटवीर क्रिकेटच्या मैदानात आपली कामगीरी बजावतातच. पण यावेळी अभिनेत्याने स्मूथ शॉट मारत सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात तो क्रिकेट खेळताना दिसत आहे. दरम्यान शाहिद लवकरच ‘जर्सी’ (Jersey) या चित्रपटात दिसणार आहे. त्यात तो एका क्रिकेटरची भूमिका साकरणार आहे. शाहिदने सोशल मीडियावर क्रिकेट खेळताना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर त्याने एक कॅप्शनही लिहिलं आहे, ‘‘जर्सी’च्या शुटनंतर जवळपास 1 वर्षांनंतर क्रिकेट खेळत आहे. खूप मिस करत आहे.’ या चित्रपटात शाहिद एका क्रिकेटरची बूमिका साकारणार आहे. हा चित्रपट एका तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटात पंकज कपूर (Pankaj Kapoor) आणि मृणाल ठाकुर (Mrunal Thakur) देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. व्हिडीओच्या बॅकग्राउंडला जर्सी चित्रपटाची धून देखील वाजत आहे.

  Bigg Boss OTT: गायिका नेहा भसिन ते झीशान खान, हे कलाकार झळकणार बिग बॉसच्या घरात

  200 Trailer: 'जाती के बारे मे क्यो नं बोलू सर...' संघर्षाच्या या कहाणीत दमदार भूमिका साकारणार रिंकू राजगुरू

  काही वेळापूर्वी शेअर केलेल्या व्हिडीओला लाखो व्हूज मिळाले आहेत. व्हिडीओतील शाहिदचा क्लासी क्रिकेटर अंदाज पाहून अनेकांना क्रिकेटवीरांची आठवण झाली. जूनमध्ये झालेल्या एका लाईव्ह सेशनमध्ये शाहिदने सांगितलं होतं की, या दिवाळीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आणि जर थिएटर्स बंद राहिले तर तर वेगळी स्ट्रॅटजी घेऊन तो येमणार आहे. त्यामुळे इतर अनेक चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटही ओटीटीवर येण्याची शक्यता आहे. याशिवाय शाहिद लवकरच डिजीटल विश्वात पदार्पण करत आहे. त्याने काही प्रोजेक्ट साइन केले आहेत. शाहिद एका थ्रिलर बेवसीरिजमधून पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actor, Entertainment, Shahid kapoor, Shahid Kapoor-Mira Rajput

  पुढील बातम्या