पुणे, 26 जून- अभिनेता नाना पाटेकर यांना मीटू (Metoo)प्रकरणी पोलिसांनी दबावाखाली क्लीन चिट दिल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला होता. या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तनुश्री हिने मध्यस्थामार्फत तक्रार पाठवली होती. तरी देखील आम्ही तिच्या तक्रारीची दखल घेवून संबंधितांना नोटीसाही पाठवल्या. परंतु तनुश्रीने स्वतः आली नाही. तिने यायला हवं होतं. मात्र, तनुश्री फिरकली नाही, असं रहाटकर यावेळी म्हणाल्या. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तनुश्री दत्ता यांच्याकडून आम्हाला त्या प्रकरणाविषयी माहिती जाणून घ्यायची होती, असेही रहाटकर यावेळी म्हणाल्या. तनुश्री दत्ता यांनी MeToo प्रकरणावर आक्षेप नोंदवले आहेत. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या.
काय आहे MeToo प्रकरण? अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्याशी हॉर्न ओके प्लिजच्या सेटवर गैरवर्तन केल्याप्रकरणी नाना पाटेकर यांना क्लिन चिट मिळाली आहे. या प्रकरणी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने ओशिवरा पोलिस ठाण्यात नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार केली होती. या तक्रारीचा अहवाल अंधेरी न्यायालयात सादर करण्यात आला. मात्र पोलिसांना नाना पाटेवर यांच्या विरोधात कोणताही ठेस पुरावा न सापल्यानं नाना पाटेवर यांना आता दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी तनुश्री दत्तानं MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. ‘हॉर्न ओके प्लिज’ या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी मला चुकीच्या पद्धातीनं स्पर्श केल्याचं तनुश्रीनं म्हटलं होतं. या सिनेमात आयटम साँग तनुश्री करत होती मात्र तिला या गाण्यातील काही स्टेपवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे सिनेमाच्या सेटवर प्रचंड गोंधळ माजला होता. त्यानंतर तनुश्री या सिनेमातून माघार घेतली आणि ती परदेशात निघून गेली. मात्र मागील वर्षी भारतात परतल्यावर तिनं नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली मात्र पोलिस तपासात हे सर्व आरोप कमकुवत असल्याचं तसेच नाना पाटेकर यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचं दिसून आलं त्यामुळे नाना पाटेकर यांना आता दिलासा मिळाला आहे. VIDEO: आधी शिवरायांची वेशभूषा, आता पोलिसांचा गणवेश; राष्ट्रवादीचा आमदार वादात