मुंबई, 5 जून- देशात जरी कोरोनाची तिसरी लाट मंदावली असली तरी कोव्हीडचा धोका कायम आहे. बॉलिवूडमध्ये मात्र कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाल्याचे दिसून येत आहे. अक्षय कुमार, कर्तिक आर्यन, कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्यानंतर आता बॉलिवूडचा किंग खान शाहरूखला ( Shah Rukh Khan tests positive Covid-19 ) देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. CNN न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, शाहरूख खानला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत अद्याप शाहरूखच्या टीमकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Get well soon 👑
— Anurag🌶️ (@imAnurag18_) June 5, 2022
मागच्या काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. या कलकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली होती. तसेत सध्या सगळीकडे अशी देखील चर्चा आहे की, करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीतून काही बॉलिवूड सेलेब्सना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्टीत सहभागी झालेल्या काही सेलेब्सना कोरोनाची लागण झाल्याती माहिती समोर आलेली आहे. वाचा- OMG! अभिषेकला नाचताना बघून ऍशला आवरला नाही मोह; असं काही केलं की प्रेक्षकही झाले दंग शाहरूख खान आणि कतरिना कैफच्या कामाबद्दल सांगायचे तर, शाहरूख खानकडे काही मोठे प्रोजेक्ट आहेत. ज्यामध्ये, पठाण, डंकी, जवान या सिनेमांचा समावेश आहे. याशिवाय शाहरूख काही सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून देखील दिसणार आहे. तर कतरिना कैफच्या कामाबद्दल सांगायचे तर कतरिना टायगर 3 सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती ‘फोन भूत’ या सिनेमात देखील दिसणार आहे.