मुंबई, 20 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या सुंदर डान्समुळे प्रसिद्ध आहे. तिच्या बाहुबली आणि सत्यमेव जयते चित्रपटामधील दिलबर गाण्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात चर्चेत होती. नोरा फतेही बिग बॉसची देखील सदस्य होती. या शोनंतर तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटामध्ये धमाकेदार डान्स परफॉरमेस केले. आता स्ट्रीट डान्सर या चित्रपटामध्ये तिने धामाकेदार डान्स केला आहे. तिच्या डान्सवर चाहते घायाळ झाले आहे. नोराच्या अदा आणि डान्सचं सोशल मीडियावर फॅन्सकडून कौतुक होत आहे. रॅपर बादशाह यांनी नोराला एक चॅलेंज दिलं आणि नोरानं ते स्वीकारलं. नोरानं प्रसिद्ध रॅपर बादशाह यांना खरंच भर दिवसा तारे दाखवले असं म्हणायची वेळ आली.
अभिनेत्री नोरा फतेही आणि प्रसिद्ध रॅपर बादशाह यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा फतेहीने बादशाला घाबरवून त्याचे वाईट हाल केलं आहे. या व्हिडिओमध्ये बादशाह आणि नोरा मोबाईलमध्ये स्ट्रीट डान्सर या चित्रपटमधील गरमी गाणं पाहत असतो. तेव्हाच बादशाह यांनी नोराला एक चॅलेज दिले. नोराने त्याबद्दल थोडा विचार करुन ते चॅलेज स्वीकारलं आणि त्यानंतर काय झालं ते तुम्ही पाहूच शकता या व्हिडिओमध्ये. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा-बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहा एका क्लिकवर
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, बादशाह जिथे जात आहेत तिथे नोरा त्यांना गरमी गाण्यातली स्टेप करताना दिसत आहे. नोरा फक्त बादशाह यांनाच दिसत असते त्यामुळे ते हैराण होतात. नोरा बादशाह यांचे चॅलेंज पूर्ण करते. या व्हिडिओमध्ये बादशाहचे बेहाल झाल्याचं आपल्याला दिसत आहे. नोराने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अंकाऊटवरुन शेअर केला आहे. आता पर्यत 2 लाख 11 हजारपेक्षा जास्त वेळा लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला चाहत्यानी पसंती देच अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बॉलिवूड आणि बोल्डनेस हे समीकरण दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. 'गर्मी' सॉन्गमध्ये नोरा फतेही (nora fatehi) आणि वरुण धवन (varun dhawan) यांच्या किलर डान्स मूव्ह पाहायला मिळत आहेत. पण या गाण्याला नोरानं दिलेला बोल्डनेसचा तडका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नोरानं डान्स केलेल्या आतापर्यंतच्या गाण्यांमध्ये हे सर्वाधिक बोल्ड गाणं असल्याचं बोललं जात आहे. या गाण्याच्या सुरुवातीलाच सूचना देण्यात आली आहे. 'सावधान, जो आप देखने जा रहे हैं वो इतना हॉट है कि उसे नजरअंदाज करना मुश्किल है'. यानंतर नोराचा बोल्ड आणि सिजलिंग अवतार या गाण्यात दिसत आहे.
हेही वाचा-अपघात शबाना आझमींचा आणि ट्रोल झाली उर्वशी रौतेला ते सुद्धा मोदींच्या ट्वीटवरून!