जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Samantha Ruth Prabhu: 'पुष्पा 2' मध्ये पुन्हा दिसणार समंथाच्या अदांचा जलवा? समोर आली मोठी अपडेट

Samantha Ruth Prabhu: 'पुष्पा 2' मध्ये पुन्हा दिसणार समंथाच्या अदांचा जलवा? समोर आली मोठी अपडेट

समंथा रुथ प्रभू

समंथा रुथ प्रभू

‘उ अंटवा’ या गाण्यातील समंथाचा बोल्ड अंदाज सगळ्यांनाच घायाळ करणारा होता. सगळ्यांनाच पुष्पा 2 मध्ये पण समंथाच्या अदा पाहायला मिळणार का याची उत्सुकता आहे. त्याबद्दल एक अपडेट समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 फेब्रुवारी : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू नुकतीच गंभीर आजारातून बरी झाली आहे. गेले काही दिवस तिची प्रकृती स्थिर नव्हती. तिला गंभीर आजाराचे निदान झाले होते. चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत होते. पण आता ती या आजारातून पूर्णपणे बरी झाली असून नव्या जोमानं पुन्हा कामाला लागली आहे. ती सध्या मुंबईत तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या वेब सीरिजचे शूटिंग करत आहे. तसंच  ती तिच्या ‘शाकुन्तलम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यक्त आहे. अशातच ती अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या सिनेमात दिसणार का याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या सिनेमानं मागचं वर्ष चांगलंच गाजवलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला. आता प्रेक्षकांना  ‘पुष्पा २’ ची उत्सुकता आहे. सिनेमासोबतच यातील गाणी देखील खूप गाजली. या चित्रपटातील समंथाचं ‘उ अंटवा’ हे गाणं विशेष गाजलं. या गाण्यातील समंथाचा बोल्ड अंदाज सगळ्यांनाच घायाळ करणारा होता. सगळ्यांनाच पुष्पा २ मध्ये पण समंथाच्या अदा पाहायला मिळणार का याची उत्सुकता आहे. त्याबद्दल एक अपडेट समोर आली आहे. हेही वाचा - Swara Bhaskar Wedding: आधी म्हटलं भैय्या मग बनवलं सैंय्या; 15 दिवसांपूर्वी केलेल्या त्या ट्विटमुळं स्वरा भास्कर होतेय ट्रोल साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू नुकतीच तिच्या आजारातून बरी झाली असून ती सध्या तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या वेब सीरिजचे शूटिंग करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथाने पुष्पा-2 ची ऑफर नाकारली आहे. असे सांगितले जात आहे की, अभिनेत्रीला चित्रपटात आयटम सॉंगची ऑफर देण्यात आली होती परंतु समंथाने हे गाणे करण्यास नकार दिला आहे. अभिनेत्रीने पुष्पा 2 ची ही ऑफर का नाकारली असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

जाहिरात

पुष्पा  या चित्रपटातील ‘उ अंटवा’  हे आयटम साँग खूप चर्चेत आले होते. समंथा पुष्पा-2 मध्ये 3 मिनिटांचे गाणे करणार होती. या 3 मिनिटांच्या गाण्यासाठी अभिनेत्रीला तब्बल 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती पण समंथाने ती नाकारली. कारण तिला करिअरच्या या टप्प्यावर विशेष आयटम साँग करायचं नाहीये. अशी माहिती समोर आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, दिग्दर्शक सुकुमार या अभिनेत्रीला चित्रपटाचा एक भाग म्हणून पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. समंथा रुथ प्रभूच्या नकारामुळे अभिनेत्री तेलगू फिल्म इंडस्ट्रीकडे दुर्लक्ष करत आहे अशी चाटच टॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पुन्हा सुरु झाली आहे. पुष्पा 2 बद्दल सांगायचं तर अल्लू अर्जुनच्या 41 व्या वाढदिवसानिमित्त पुष्पा 2 ची एक छोटी झलक किंवा टीझर व्हिडिओ रिलीज केला जाईल. अल्लू अर्जुनचा वाढदिवस ८ एप्रिलला आहे आणि याच दिवशी पुष्पा २ चा फर्स्ट लूक समोर येऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात