मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; आता SEBI नं ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; आता SEBI नं ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?

इनसायडर ट्रेडिंगच्या (Insider trading scam) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची कंपनी वियान इंडस्ट्रीजवर सेबीने कारवाई केली आहे.

इनसायडर ट्रेडिंगच्या (Insider trading scam) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची कंपनी वियान इंडस्ट्रीजवर सेबीने कारवाई केली आहे.

इनसायडर ट्रेडिंगच्या (Insider trading scam) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची कंपनी वियान इंडस्ट्रीजवर सेबीने कारवाई केली आहे.

    नवी दिल्ली 29 जुलै: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) या दाम्पत्यासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अटक (Raj Kundra pornography matter) केल्यानंतर, आता सेबीने (Securities and Exchange Board of India) शिल्पा आणि राज कुंद्राची कंपनी वियान इंडस्ट्रीजला (Viaan Industries) तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शेअर बाजारातील इनसायडर ट्रेडिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

    एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इनसायडर ट्रेडिंगच्या (Insider trading scam) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची कंपनी वियान इंडस्ट्रीजवर सेबीने कारवाई केली आहे. यासाठी कंपनीला तीन लाख रुपयांचा दंड (Viaan Industries fine) ठोठावण्यात आला आहे.

    HBD: संजय-माधुरीमध्ये कशामुळे आला दुरावा? धकधक गर्ल आजही आहे संजूबाबाची फेव्हरेट

    दरम्यान, पॉर्नोग्राफिक फिल्म्सप्रकरणी तुरुंगात असलेल्या राज कुंद्राची जामीन याचिका बुधवारी फेटाळण्यात आली. पॉर्नोग्राफिक फिल्म्स बनवून काही अॅप्सच्या माध्यमातून त्या प्रसारित केल्याचा आरोप राज कुंद्रावर (Raj Kundra apps) आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने राज कुंद्राला 19 जुलै रोजी अटक केली होती. या प्रकरणी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    मंगळवारी (27 जुलै) राज कुंद्राला एका मॅजिस्ट्रेट न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर कुंद्राने जामीन याचिका दाखल केली होती. मात्र, बुधवारी न्यायालयाने ही याचिका फेटाळत (Raj Kundra bail) त्याची कोठडी कायम ठेवली. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर तत्काळ सुटका करण्यास परवानगी नाकारली होती. दरम्यान, राज कुंद्राची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा सात दिवसांच्या पोलीस रिमांडची (Raj Kundra police remand) मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी तिसऱ्यांदा फेटाळली.

    तब्बल 21 वर्षे लहान मान्यता सोबत संजय दत्तचे जुळले सूत; असं झालं तिसरं लग्न

    हॉटशॉट्सच्या माध्यमातून कुंद्राने केली कोट्यवधींची कमाई

    मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान राज कुंद्राने आर्म्सप्राईम मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तयार केल्याचे समोर आले. या कंपनीने लंडनच्या की केनरिन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मदतीने सोशल मीडियावर अक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करण्यासाठी हॉटशॉट्स हे अॅप (Raj Kundra app Hotshots) विकत घेतले.

    या अॅपच्या माध्यमातून (Hotshots app income) गेल्या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या दरम्यान कुंद्राने 1.17 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच, छापेमारीमध्ये असे 51 अक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

    First published:
    top videos

      Tags: Raj kundra, Sebi, Shilpa shetty