दरम्यान याआधी संजयचे दोन विवाह झाले होते. 1987 साली त्याने अभिनेत्री रिचा शर्मा हिच्याशी विवाह केला होता. पण रिचाला ब्रेन ट्युमर होता. 1996 साली तिचा या दिर्घ आजाराने मृत्यु झाला. त्यांना त्रिशला दत्त (Trishala Dutt) ही मुलगी देखील आहे. ती अमेरिकेत तिच्या आजी आजोबांसोबत (आईचे आईबाबा) राहते. तर त्यानंतर त्याने एअरहोस्टेस आणि मॉडेल रिया पिल्लईसोबत 1998 साली विवाह केला. पण हा ही संसार फार काळ टिकू शकला नाही. काही वर्षातचं त्यांनी घटस्फोट घेतला होता.View this post on Instagram
सलमान खानच नाही तर 'या' सेलेब्सनी केलंय Bigg Boss होस्ट; नव्या पर्वासाठी करण जोहर सज्ज
2010 साली मान्यता आणि संजय यांना दोन जुळी मुलं झालं. शरान आणि इकरा अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. दत्त कुटुंबासोबतच मान्यता त्यांचं प्रोडक्शन हाऊसही सांभाळते. संजयच्या प्रत्येक वाईट काळतही मान्यता त्याच्यासोबत खंबीरपणे उभी होती.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Entertainment, Sanjay dutt