मुंबई 29 जुलै : अभिनेता संजय दत्तचा (Sanjay Dutt) जन्म एका सुखसंपन्न तसेच फिल्मी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला होता. मात्र त्याचं खाजगी आयुष्य हे नेहमीच विवादीत आणि फारच संघर्षाचं ठरलं होतं. संजयने फार कमी वयात त्याच्या आयुष्यात मोठे उतार -चढाव पाहिले होते. यातीलच एक म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत (Madhuri Dixit) असलेले संजयचे संबंध. आज दोघेही आपापल्या आयुष्यात फार पुढे गेले असले तरीही त्यांच्या नात्याची अजुनही चर्चा होते.
आज संजय दत्त म्हणजेच बॉलिवूडचा संजूबाबा 62 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचा लाडका मुलगा संजय त्याच्या वैयक्तीक आयुष्यात नेहमीच झगडत राहीला होता. त्यातील त्याचे अफेअर्सही नेहमी चर्चेचा विषय ठरले होते. संजय - माधुरी हे समीकरण आजही त्यांचे चाहते पाहणं पसंत करतात. (Sanjay Dutt Birthday)
खलनायक, साजन, ठाणेदार, कानून अपना अपना या चित्रपटांत संजय आणि माधुरी यांनी स्क्रीन शेअर केली होती. त्या दरम्यान त्यांच्या अफेअर्सच्या तुफान चर्चा होत्या. संजय हा माधुरीच्या प्रेमात अखंड बुडाला होता. असही अनेकदा ऐकायला मिळतं. यासीर उस्मीन यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, संजय आणि माधुरी यांच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने त्यांना सांगितलं होतं की शुटींग दरम्यान संजय माधुरीच्या आसपासचं फिरायचा.
तब्बल 21 वर्षे लहान मान्यता सोबत संजय दत्तचे जुळले सुत; असं झालं संजूबाबाचं तिसरं लग्न
View this post on Instagram
दरम्यान माधुरी आणि संजयची मैत्री वाढली होती. दोघांनीही आपल्यात कधीच काही होतं हे मान्य केलं नाही. तर मीडियामध्ये पसरणाऱ्या अफेअर्सच्या बातम्यांनतर संजयने माधुरीची माफी देखील मागितली होती. पण त्यांच्यातील मैत्री ही संजयच्या संसारासाठी घातक ठरत होती. संजयने 1987 साली अभिनेत्री रिचा शर्माशी विवाह केला होता. तर त्यांच्यातील दुराव्याला माधुरीच जबाबदार असल्याचं वक्तव्य रिचाच्या बहिणीने केलं होतं.
काही काळानंतर मात्र माधुरी आणि संजयची मैत्रीही तुटली होती. माधुरीने आपल्या एका मैत्रीणीकडून संजयला फोन करू नकोस असंही सांगितलं होतं. दरम्यान तो काळ होता 1993 चा जेव्हा संजयला पोलिसांनी अटक केली होती. अवैध शस्त्र बाळगळ्याप्रकरणी संजयला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर माधुरीने संजयशी सगळे संबंध तोडून टाकले होते. व त्यांच्या नात्यावरील चर्चांनाही तिथेच पूर्णविराम मिळाला होता.
View this post on Instagram
परंतू संजय दत्तची आजही माधुरीच आवडती अभिनेत्री आहे. 2017 साली एका मुलाखतीत संजयला ‘पुन्हा लग्न केलंस तर कोणाशी करशील?’ असं विचारंल होतं, तेव्हा संजयने माधुरीचंच नाव घेतलं. माधुरी आणि संजयने 2019 साली आलेल्या ‘कलंक’ या चित्रपटात पुन्हा एकदा काम केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Madhuri dixit, Sanjay dutt