जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मुंबईचा 'तो' भूतबंगला ज्यात राहण्यासाठी वेडे होते बॉलिवूडचे दोन सुपरस्टार्स; तिथे जे घडलं ते वाचून व्हाल थक्क

मुंबईचा 'तो' भूतबंगला ज्यात राहण्यासाठी वेडे होते बॉलिवूडचे दोन सुपरस्टार्स; तिथे जे घडलं ते वाचून व्हाल थक्क

राजेंद्र कुमार आणि राजेश खन्ना

राजेंद्र कुमार आणि राजेश खन्ना

बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या आयुष्याशी निगडीत अशीच एक कहाणी म्हणजे ‘झपाटलेला बंगला’. मुंबईच्या कार्टर रोडवर असलेला बंगला, ज्यामध्ये दोन सुपरस्टार्सनं आपलं आयुष्य घालवलं. इतकंच नाही तर या झपाटलेल्या बंगल्यानं आपलं नशीब उजळलं असं दोघांचं मत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 एप्रिल : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी आहेत जे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात आणि त्याप्रमाणे आपली सर्व कामे करतात. मग ती अंगठी घालणे असो किंवा नावांमध्ये बदल करणं असो. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या आयुष्याशी निगडीत अशीच एक कहाणी म्हणजे ‘झपाटलेला बंगला’. मुंबईच्या कार्टर रोडवर असलेला बंगला, ज्यामध्ये  दोन सुपरस्टार्सनं आपलं आयुष्य घालवलं. इतकंच नाही तर या झपाटलेल्या बंगल्यानं आपलं नशीब उजळलं असं दोघांचं मत आहे. हे दोन सुपरस्टार होते राजेंद्र कुमार आणि राजेश खन्ना. राजेंद्र कुमार चित्रपटसृष्टीत आपला जम बसवण्यात व्यस्त होते त्या दिवसांची गोष्ट आहे. 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या राजेंद्र कुमार यांना बॉलिवूडचा ‘ज्युबली कुमार’ म्हटले जात होते. कारण त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर 25 आठवडे टिकायचे. यामागे त्यांची मेहनत तर होतीच, तसेच एक अंधश्रद्धाही जोडलेली होती. 1949 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या राजेंद्र कुमार यांना ‘मदर इंडिया’, ‘घर संसार’, ‘कानून’, ‘धर्मपुत्र’ या चित्रपटांनी त्यांना स्टार बनवले. पण तरीही राजेंद्र कुमार सुपरस्टार होण्यासाठी धडपडत होते. दुसरीकडे ते कुटुंबासाठी मोठं घर शोधत होते. हा शोध त्यांना कार्टर रोडवर घेऊन गेला. तिथल्या एका बंगल्यानं राजेंद्रकुमारला भुरळ घातली. पण बंगला खूप महाग होता. यासोबतच हा भूतबंगला असल्याचेही अनेकांनी सांगितले. रामायणात भरताच्या पत्नीच्या भूमिकेने मिळवून दिली ओळख; 36 वर्षांनंतर आता अशी दिसतेय अभिनेत्री तो बंगला विकत घेण्यासाठीही राजेंद्र कुमार यांच्याकडे पैसे नव्हते. पण समुद्रकिनाऱ्यावरचा बंगला पाहिल्यानंतर त्यांनी कोणाचेही न ऐकता कसा तरी तो बंगला विकत घेतला. त्यांनी आपल्या मुलीच्या नावावरून बंगल्याचे नाव ‘डिंपल’ ठेवले. हा बंगला राजेंद्र कुमार यांच्यासाठी लकी ठरला. त्यानंतर त्यांनी एकामागून एक हिट चित्रपट दिले. राजेंद्र कुमार वरून ते ‘ज्युबली कुमार’ झाले. हा तो काळ होता जेव्हा राजेंद्र कुमार बॉलिवूडचे सर्वात श्रीमंत सुपरस्टार बनले होते. मात्र काही वर्षांनी अचानक राजेंद्र कुमार यांच्या करिअरला ब्रेक लागला. राजेश खन्ना यांनी राजेंद्रकुमारला कडवी टक्कर दिली. राजेंद्र कुमार यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यामुळे मुख्य भूमिकेऐवजी ते सहाय्यक भूमिका करू लागले. त्यानंतर अशी परिस्थिती आली की राजेंद्र कुमार यांना त्यांचा ‘डिंपल’ बंगला विकावा लागला. इथेच राजेश खन्नांची एंट्री झाली. राजेंद्र कुमार यांच्या या बंगल्याची इंडस्ट्रीत बरीच चर्चा झाली होती. त्या ‘भूत बंगल्या’नेच राजेंद्रकुमार यांचे नशीब उजळले, असे लोक म्हणायचे. राजेश खन्ना यांना बंगला खरेदी करायचा होता. यामागे बंगल्याचं सौंदर्य होतं, पण बंगला आला तर स्टारडमही येईल, अशी अंधश्रद्धाही होती.

News18

सीमा सोनिक अलीमचंद यांच्या ‘जुबली कुमार: द लाइफ अँड टाइम्स ऑफ अ सुपरस्टार’ या पुस्तकात याचा उल्लेख आहे. 1969 मध्ये राजेश खन्ना यांनी राजेंद्र कुमार यांचा बंगला विकत घेतला. राजेंद्र कुमार यांनी राजेश खन्ना यांना बंगल्याचे नाव बदलावे लागेल, अशी अट घातली. राजेश खन्ना यांनी या बंगल्याला ‘आशीर्वाद’ असे नाव दिले. राजेश खन्ना यांच्यासाठीही हा बंगला लकी ठरला, असे म्हटले जाते. राजेश खन्ना बंगल्यात शिफ्ट झाल्यानंतर त्यांचे नशीब उजळले. तो सुपरस्टार झाला. ‘आराधना’, ‘इत्तेफाक’ आणि ‘दो रास्ते’ यांसारख्या चित्रपटांनी राजेश खन्ना यांना हवी असलेली लोकप्रियता दिली. पुस्तकानुसार, राजेश खन्ना एकदा राजेंद्र कुमार यांना म्हणाले होते, ‘तुझे स्टारडम शिखरावर आहे. मी नुकतीच सुरुवात केली आहे… जर मी तुमचा बंगला विकत घेतला तर माझे आयुष्यही बदलेल. शेवटी तो सुपरस्टारचा बंगला आहे.’ राजेश खन्ना यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस याच बंगल्यात घालवले. तेव्हा त्यांनी हा बंगला साडेतीन लाख रुपयांना विकत घेतला होता. पैसे कमी होते, त्यामुळे राजेश खन्ना यांनी EMI वर पैसे दिले. हा बंगला विकत घेण्यासाठी राजेश खन्ना यांनी ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट साईन केला होता.

News18लोकमत
News18लोकमत

तथापि, 2012 मध्ये राजेश खन्ना यांच्या निधनानंतर, त्यांच्या कुटुंबाने ऑल कार्गो लॉजिस्टिक्सचे चेअरमन शशी किरण शेट्टी यांना 90 कोटी रुपयांना बंगला विकला. 2016 मध्ये शेट्टी यांनी ‘आशीर्वाद’ बंगला पाडून तेथे नवीन चार मजली घर बांधले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात