मुंबई, 24 मे: मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) काही दिवसांपासून जेवण बनवताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्याचे शेफच्या वेशालते फोटो देखील चांगलेच व्हायरल झाले होते. ललितच्या ‘मीडियम स्पायसी’ (medium spicy) या सिनेमाचं तो प्रमोशन करत होता. ललितच्या या नव्या सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. आज अखेर ललितच्या मीडियम स्पायसी सिनेमाचा ट्रेरल (Medium Spicy Trailer) प्रेक्षकांच्या भेटील आला आहे. ललित प्रभाकर, सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि पर्ण पेठे (Parna Pethe ) सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तिघांच्या प्रेमाचा ट्रँगल ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. 2 मिनिटे 5 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये प्रेमाचा लव्ह ट्रँगल पाहायला मिळतोय. ‘श्रेयस काम काम होता है लाइफ नाही’ या अभिनेता सागर देशमुखच्या वाक्याने होते. त्यानंतर ‘तुझं शेफ प्राजक्तावर क्रश आहे. पण टिनएजरसारखा हसी मजाकमध्ये वेळ घालवतोयस’, असं शेफ गौरी त्याला सांगते. प्राजक्ताला देखील श्रेयस आवडत असतो. ट्रेलमध्ये सागर आणि सई ललितची मदत करताना दिसत आहेत. तर मध्येच ललित आणि सई यांच्यातही काहीतरी असल्याचं समोर येत आहे. ट्रेलरमध्ये ललितचे सई आणि पर्ण सोबत काही रोमँटीक सीन्स देखील पाहायला मिळत आहेत. ट्रेलरमध्ये ‘लाईफ इज कॅम्पिलिकेटेड’ हे ललित प्रभाकरचं वाक्य सर्वांच लक्ष वेधून घेतं. हेही वाचा - VIDEO: ‘तुम्ही माझ्या आयुष्यात…’, क्रांती रेडकरची नवऱ्यासाठी खास पोस्ट
ट्रेलरमध्ये नीना कुळकर्णी यांची एंट्री लक्षात पाहणारी आहे. तर सागर देशमुख आणि ललित यांच्यातही काही भावूक संवाद पाहायला मिळत आहे. ‘आयुष्यात एकट्यानं जगणं मुश्किल असतं, कुणाची तरी सोबत लागतेच’, असं सांगताना सागर दिसतोय. तर दुसरीकडे ललित पॅरिसला जाण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. ट्रेलरच्या शेवटी सागर ललितला म्हणतो, ‘तुला पॅरीस नको, प्राजक्ता नको, गौरी नको मग पाहिजे तरी काय?’ ट्रेलरच्या या शेवटाने सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण केली आहे. मीडियम स्पायसी या सिनेमात अनेक कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. ललित, सई आणि पर्ण सोबतच सिनेमात अभिनेत्री नीना कुळकर्णी, सागर देशमुख, पुष्कराज चिरपुटकर, नेहा जोशी, रविंद्र मंकणी हे कलाकारही आहेत. अभिनेत्री पर्ण पेठेने सिनेमात प्राजक्ताची भूमिका साकारलेय तर सई सिनेमात शेफ गौरीची भूमिका साकारत आहे. तर ललित श्रेयस ही व्यक्तिरेखा साकारत आहे. नीना कुळकर्णी या ललितची आई म्हणून सिनेमात दिसणार आहेत. तर रविंद्र मंकणी वडिलांची भूमिका साकारणार आहेत. नेहा जोशी ललितच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. अभिनेता पुष्कराज चिरपुटकर सिनेमात कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.