Home /News /entertainment /

Scam 1992 मध्ये काम कसं मिळालं; पाहा अँटिना दुरुस्त करणाऱ्या प्रतिकचा संघर्षमय प्रवास

Scam 1992 मध्ये काम कसं मिळालं; पाहा अँटिना दुरुस्त करणाऱ्या प्रतिकचा संघर्षमय प्रवास

महापूरात प्रतिक गांधीचं घर गेलं होतं वाहून; पाहा अभिनेत्याचा संघर्षमय प्रवास

    मुंबई 11 एप्रिल: स्कॅम 1992 (Scam 1992) या सुपरहिट वेब सीरिजमुळं रातोरात सुपरस्टार झालेला प्रतिक गांधी (Pratik Gandhi) हा सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. मोठमोठे समिक्षक देखील त्याच्या अभिनय शैलीची तोंडभरुन स्तुती करत आहेत. एवढंच काय तर प्रतिकच्या जबरदस्त अभिनयाचा फटका अभिषेक बच्चनच्या बिग बजेट चित्रपटाला देखील बसला. यावरुनच त्याच्या लोकप्रियतेच्या अंदाज येतो. (Evolution of an Actor) पण आज प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला प्रतिक कधीकाळी दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत होता. तो घरावरील टीव्ही अँटिना दुरुस्त करुन आपलं गुजराण करत होता. प्रतिकनं ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं आपला संघर्षमय प्रवास सांगितला. त्याचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. पण लहानपणापासूनच त्यानं मोठी स्वप्न पाहिली. त्याला सुपरस्टार व्हायचं होतं. यासाठी त्यानं अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यानं चौथीत असताना पहिल्यांदा स्टेजवर अभिनय केला होता. त्यानंतर त्यानं कधी मागे वळून पाहिलं नाही. 2006 साली सुरतमध्ये आलेल्या एका महापूरात त्याचं घर वाहून गेलं. त्यांनी एक-एक रुपये साठवून जमा केलेल्या वस्तू त्यानं डोळ्यांसमोर वाहून जाताना पाहिलं. त्यानंतर काम मिळवण्यासाठी तो मुंबईत आला. याठिकाणी तो टीव्ही अँटिना दुरुस्त करण्याची काम करत होता. शिवाय अभिनयाची संधी मिळावी यासाठी ऑडिशन देखील देत होता. अवश्य पाहा - ‘अनोळखी कॉलरपासून सावध राहा’; मराठी अभिनेत्याला केलं जातंय ब्लॅकमेल याच दरम्यान त्याला स्कॅम 1992 या वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या सीरिजसाठी प्रतिकनं जबरदस्त तयारी केली होती. हर्षद मेहताबाबत आलेली प्रत्येक बातमी, त्याच्यावरील लेख, त्याच्या मुलाखती, व्हिडीओ अगदी जे मिळेल ते त्यानं पाहिलं. या भूमिकेसाठी तो तब्बल सहा महिने दिवस-रात्र तयारी करत होता. अन् या मेहनतीचं फळ त्याला मिळालंच. ही सीरिज सुपरहिट ठरली. आज प्रेक्षक प्रतिक गांधीची तुलना बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्याशी करत आहेत. प्रतिकच्या मते “आयुष्यात संधी प्रत्येकाला मिळते, पण त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण तयार राहायला हवं. सतत स्वत:ला अपडेट करा. नव्या गोष्टी शिका, कालबाह्य होऊ नका. मग तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.”
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Actor, Entertainment, Financial crime, Scam, Web series

    पुढील बातम्या