मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sayaji Shinde: 'आपला देश राजकारणी लोकांनी जास्त लुटला... ' अभिनेते सयाजी शिंदेंचं मोठं वक्तव्य

Sayaji Shinde: 'आपला देश राजकारणी लोकांनी जास्त लुटला... ' अभिनेते सयाजी शिंदेंचं मोठं वक्तव्य

सयाजी शिंदे

सयाजी शिंदे

सयाजी शिंदे राज्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी ओळखले जातात. सयाजी शिंदे यांनी वृक्ष मित्र आणि नागरिकांच्या पुढाकारातून ठिकठिकाणी काम सुरु आहे. आता याबद्दल सयाजी शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 मार्च :  मराठी-हिंदी आणि दाक्षिणात्य अशा सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलेले अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे होय. सयाजी शिंदेंचा मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्याने विविध सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. पडद्यावर खतरनाक खलनायक म्हणून प्रसिद्ध असणारे सयाजी खऱ्या आयुष्यात मात्र रिअल हिरो आहेत. सयाजी शिंदे राज्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी ओळखले जातात. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष मित्र आणि नागरिकांच्या पुढाकारातून ठिकठिकाणी काम सुरु आहे. आता याबद्दल सयाजी शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

बीड जिल्ह्यात काही ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. या कार्यक्रमात सयाजी शिंदे सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी भारतात घटणाऱ्या वृक्षक्षेत्रावर आपलं मत मांडलं आहे. वनदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात 'झाड तोडणाऱ्यांना दहशत बसेल असे मजबूत कायदे करा..वन कायदे रिवाईस झाले पाहिजे..' अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी बोलताना वृक्ष लागवडीसह इतर 70 वर्षाचा हिशोब काढला तर इंग्रजां पेक्षा आपला देश आपल्याच राजकारणी लोकांनी जास्त लुटला असा आरोप सीने अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला आहे.

दिशा सालियानच्या मृत्यूनंतर एक्स बॉयफ्रेंड लवकरच बांधणार लग्नगाठ; म्हणाला, 'तिला विसरणं कठीण पण...'

निसर्गाच्या बाबतीतील कायदे हे रिवाईज व्हायला पाहिजेत आणि सरकारने सुद्धा गंभीरतेनं घेतलं पाहिजे. झाड तोडणाऱ्यांना दहशत बसेल असे मजबूत कायदे असले पाहिजेत. शासकीय कर्मचारी असो वा सामान्य नागरिक वृक्षतोडी संदर्भात कठोर कायदे करा अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

त्याबरोबरच देशातील भ्रष्टाचार या संदर्भात भाष्य करताना आणि राजकारण संदर्भात बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की बऱ्याच जणांना खूप पैसे कमवण्याचा रोग जडलेला आहे.. नोकरी व्यतिरिक्त पैसा कमवून हा रोगच आहे असे देखील सयाजी शिंदे म्हणाले. विकासाच्या नावाखाली रस्त्याच्या कडे ते शंभर शंभर वर्षाचे वृक्ष तोडणे हे चुकीच आहे हे वृक्ष वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.  असं मत देखील सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

बीड जिल्ह्यातील वन क्षेत्र वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.. रस्ते विकास आणि रुंदीकरनासाठी होणारी झाडाची कत्तल थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे सयाजी शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तसंच 'जगातील सर्वात मोठा सेलिब्रिटी झाडं आहे' असं मत त्यांनी यावेळी बोलताना मांडलं आहे.

सयाजी शिंदे आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या सामाजिक कार्यासाठीदेखील ओळखले जातात. सयाजी शिंदेनी झाडे लावण्याचा आणि वृक्षतोड रोखण्याचा विडा उचलला आहे. ते सतत झाडे लावा, झाडे जगवा अशा उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करत असतात. त्यांच्या या उपक्रमाला ठिकठिकाणचे नागरिक चांगला प्रतिसाद देतात.

First published:
top videos

    Tags: Marathi entertainment, Sayaji Shinde