जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Swara Bhasker Wedding: हळद लागली, मेहंदी सजली, मंडपही उभारला पण स्वरा-फहादने लग्नच केलं नाही; नेमकं काय घडलं?

Swara Bhasker Wedding: हळद लागली, मेहंदी सजली, मंडपही उभारला पण स्वरा-फहादने लग्नच केलं नाही; नेमकं काय घडलं?

स्वरा-फहाद

स्वरा-फहाद

Swara Bhasker-Fahad Ahmad Wedding:बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्कर गेल्या काही दिवसांपासून आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्रीने समाजवादी पक्षाचा युवा नेता फहाद अहमदसोबत गुपचूप लग्नगाठ बांधत सर्वांनाच चकित केलं होतं.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,14 मार्च- बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्कर गेल्या काही दिवसांपासून आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्रीने समाजवादी पक्षाचा युवा नेता फहाद अहमदसोबत गुपचूप लग्नगाठ बांधत सर्वांनाच चकित केलं होतं. अभिनेत्रीने तेव्हा कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यांनतर आपण पारंपरिक बांधणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र हळदी-मेहंदीसारखे सर्व कार्यक्रम पार पडूनही स्वरा भास्करने लग्न केलं नसल्याचं म्हटलं जात आहे, पाहूया नेमकं काय आहे कारण. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. स्वरा भास्कर आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखली जाते. स्वरा बॉलिवूड ते राजकीय प्रत्येक विषयांवर स्पष्टपणे आपली भूमिका मांडत कधी कौतुक तर कधी रोष ओढवून घेत असते. अभिनेत्रीचा एक खास चाहतावर्ग आहे. स्वराच्या चाहत्यांना तिच्या खाजगी आयुष्याबाबत नेहमीच उत्सुकता लागून असते. अभिनेत्री कधी लग्न करणार? कोणाला डेट करतेय? असे प्रश्न नेहमी तिच्या चाहत्यांच्या मनात असायचे. दरम्यान अभिनेत्री गुपचूप लग्न करत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. तसेच आंतरजातीय विवाह केल्याने काही लोकांनी तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. (हे वाचा: Aamir Khan B’day: कोण आहे आमिर खानची पहिली पत्नी? जिच्यासाठी अभिनेत्याने रक्ताने लिहलेलं लव्हलेटर ) स्वरा भास्करने समाजवादी पक्षाचे युवा नेते फहाद अहमदसोबत गुपचूप कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यांनतर अभिनेत्रीने स्वतः आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर करत, सर्वांना आपल्या लग्नाबाबत सांगितलं होतं. दरम्यान अभिनेत्रींच्या कोर्ट मॅरेजचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चाहते आणि सेलेब्रेटींनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता. तर काहींनी आक्षेपही घेतला होता. त्याचवेळी स्वराने आतापण अजून पारंपरिक पद्धतीने लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं.

News18

त्यानुसार अभिनेत्रीच्या लग्ना आधीच्या कार्यक्रमांना सुरुवातही झाली होती. स्वराने नुकतंच आपल्या हळदीचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. या फोटोंना चांगलीच पसंतीही मिळाली होती. त्यांनतर काल स्वरा आणि फहादच्या संगीत सोहळ्याचे फोटो आणि काही व्हिडीओ समोर आले होते. ज्यामध्ये हे जोडपं धम्माल करतांना दिसून आले होते. आता अभिनेत्रींचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये स्वरा मरुन रंगाच्या साडीमध्ये आहे. परंतु हे फोटो अभिनेत्रीच्या रिसेप्शनचे असल्याचं म्हटलं जात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

या सर्वांमध्ये लग्नाचे फोटो मात्र गायब आहेत, त्यामुळे या दोघांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं नसल्याचं म्हटलं जात आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्ट नुसार,स्वरा आणि फहादने कोणत्याच विशिष्ट पद्धतीने लग्न केलेलं नाहीय. या दोघांनी कोर्ट मॅरेजच केलं आहे. हे दोघे हिंदू की मुस्लिम कोणत्या पद्धतीने लग्न करणार हे पाहण्यासाठी नेटकरी उत्सुक होते. मात्र दोघांनी विशिष्ट पद्धतीने लग्न करणं टाळल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हळदी, मेहंदी, संगीत आणि रिसेप्शन असे कार्यक्रम मात्र त्यांनी पार पाडले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात