बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून बॉलिवूड अभिनेता आमिर खानला ओळखलं जातं. आमिरने नेहमीच विविध धाटणीच्या दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांवर आपली एक वेगळी छाप पाडली आहे.
अजूनही सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणारा आमिर खान आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्याच्या खाजगी आयुष्यावर एक नजर टाकूया.
आमिर खानच्या दुसऱ्या लग्नाबाबत आणि दुसरी पत्नी किरण रावबाबत जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे. परंतु अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीबाबत फारसं कोणाला माहिती नाही.
आमिरने 1986 मध्ये रीना दत्तासोबत लग्न केलं होतं. तेव्हा आमिर 21 वर्षांचा होता आणि रीना 18 वर्षांची होती.
सुरुवातीला रीनाला आमिरचं प्रेम समजलं नव्हतं, त्यामुळे आमिरने तिला एकदा स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं होतं.
परंतु एका मुलाखतीत आमिर खानने या गोष्टीचा खुलासा करत ही अत्यंत चुकीची गोष्ट असू कोणीही असं करु नये असा सल्ला दिला होता.