जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Swara Bhasker Wedding Card: स्वरा-फहादने वेडिंग कार्डसाठी शोधली भन्नाट कल्पना; छापली आत्तापर्यंतची सर्वात अनोखी लग्नपत्रिका

Swara Bhasker Wedding Card: स्वरा-फहादने वेडिंग कार्डसाठी शोधली भन्नाट कल्पना; छापली आत्तापर्यंतची सर्वात अनोखी लग्नपत्रिका

स्वरा भास्कर

स्वरा भास्कर

Swara Bhasker Wedding Card: बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी स्वरा भास्करची ओळख आहे.स्वरा आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखली जाते. अभिनेत्री नेहमीच आपल्या हटके अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 मार्च- बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी स्वरा भास्कर ची ओळख आहे.स्वरा आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखली जाते. अभिनेत्री नेहमीच आपल्या हटके अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. यंदा अभिनेत्री आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. स्वरा भास्करने नुकतंच समाजवादी पार्टीचे युवानेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज करत सर्वांनाच चकित केलं होतं. दरम्यान आता हे दोघे आपल्या पारंपरिक लग्नाच्या तयारीत आहेत. दोघांची लग्नपत्रिकाही आता समोर आली आहे. या लग्नपत्रिकेतील मजकुरामुळे सध्या स्वरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्वरा भास्कर लवकरच फहाद अहमदसोबत पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहे. यापूर्वी त्यांनी कोर्ट मॅरेज करत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. या दोघांच्या लग्नाची त्यांच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून आहे. तत्पूर्वी या दोघांची लग्नपत्रिका छापून तयार झाली आहे. नुकतंच सोशल मीडियावर या सेलिब्रेटी कपलची लग्नपत्रिका समोर आली आहे. या लग्नपत्रिकेवरील मजकुराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्वरा आणि फहादची लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत हाये. (हे वाचा: Holi 2023: अंकिता लोखंडेने दिली होळीची जंगी पार्टी; पतीसोबत बेभान होऊन रंग खेळताना दिसली अभिनेत्री ) लग्नपत्रिकेत काय आहे खास? स्वरा भास्कर आणि फहाद अहमदची लग्नपत्रिका अतिशय हटके आहे. या लग्नपत्रिकेत ‘हम भारत के लोग’, इन्कलाब जिंदाबाद’ अशी घोषवाक्ये लिहिण्यात आली आहेत. शिवाय या लग्नपत्रिकेला रेट्रो लूक देण्यासाठी यामध्ये शाहरुख खान आणि काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाचं पोस्टर खास पद्धतीने समाविष्ट करण्यात आलं आहे. ही लगपत्रिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.

जाहिरात

स्वरा भास्कर-फहाद अहमदच्या या लग्नपत्रिकेवर आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. यामध्ये अनेकांनी आपल्याला ही कल्पना आवडल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी डीडीएलजेच्या पोस्टरची संकल्पना छान असल्याचं म्हटलं आहे. स्वराचा वेडिंग कार्ड सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. इंडिया लव्ह प्रोजेक्टने आपल्या सोशल मीडियावर ही लग्नपत्रिका शेअर केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

स्वरा भास्करने करीना कपूर, सोनम कपूरसोबत ‘वीरे दी वेडिंग, कंगना रनौतसोबत ‘तनू वेड्स मनू’, हृतिक रोशनच्या ‘गुजारिश’, सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ अशा अनेक सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती सतत सोशल मीडियावर आपली रोखठोक मतं मांडताना दिसून येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात