मुंबई, 25 फेब्रुवारी- राजकारण आणि मनोरंजन विश्वाचं अनोख नातं आहे. अनेक कलाकार राजकारणात सक्रीय दिसतात. जय बच्चन, हेमा मालिनी, आदेश बांदेकर असे अनेक कलाकार आहेत मनोरंजना इतकाच राजकीय अखाडा गाजवताना दिसतात. राजकीय नेत्यांची आणि कलाकारांची मैत्रीचे अनेक किस्से आपण सर्वांनी ऐकले देखील आहेत. कलाकार देखील म़ैत्रीसाठी आपल्या मित्रांचा प्रचार करताना दिसतात. आता कोल्हापूरच्या माजी मंत्र्यांनी देखील एका अभिनेत्याला वोट करा अशी पोस्ट केली आहे. सध्या त्यांची पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी नुकतीच एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट त्यांच्या मालिका विश्वातील मित्रासाठी आहे. या मित्राचं नाव भरत दैनी असं आहे. तुम्ही सर्वांनी भरत दैनी यांना कर्लस मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत सुधा काका यांच्या भूमिकेत पाहिलचं असेल. सुधा काका ही भूमिका नकारात्मक असली तरी भरत यांनी अभिनयाच्या जीवावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. बड्डे लेकाचा अन् हवा केली बापाने, थेट गौतमीला बोलावलं, VIDEO माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी भरत यांचा फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, आमचे मित्र, अभिनेते भरत दैनी यांना कलर्स मराठी अवॉर्ड २०२३ साठी “जीव माझा गुंतला” या मालिकेतील “सुधा काका” या भूमिकेसाठी लोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा या विभागात नामांकन मिळाले आहे.
आपलं वोट Bharat Daini यांना हा पुरस्कार मिळवून देण्यासाठी मोलाचं ठरु शकते. फेसबुक किंवा गुगल वर कलर्स मराठीच्या अधिकृत पेजवर रजिस्टर करुन सोबतच्या वोटिंग लिंकवर क्लिक करा आणि भरत दैनी यांना वोट करा. वोटिंग फ्री आहे. मैत्री हे असं नातं आहे, जे काहीही करायला भाग पाडतं. दोन्ही नावं आपआपल्या क्षेत्रात मोठी आहेत. सतेज पाटील यांनी देखील आपल्या मित्रासाठी पोस्ट करत त्यांच्यातील खऱ्या मैत्रिची दर्शन घडवून दिलं आहे.
“जीव माझा गुंतला” या मालिकेचं कोल्हापूरशी खास नातं आहे. मालिकेचं चित्रीकरण कोल्हापूरात होत आहे. अंतरा आणि मल्हारची जोडी तर लोकप्रियच आहेच पण सुधा काकांची भूमिका देखील तितकीच लोकप्रिय आहे.