नुकताच अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काहीच फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री अतिशय बोल्ड अंदाजात दिसून येत आहे.
अनन्या पांडेने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती व्हाईट कलरच्या मोनोकिमिमध्ये दिसत आहे. मात्र त्यावर अभिनेत्रीनं एक जाळीसुद्धा परिधान केली आहे.
अभिनेत्रीचा हा हटके लूक काहींना आवडला आहे. तर काही युजर्स अनन्या पांडेच्या फॅशन सेन्सची खिल्ली उडवत आहेत.
इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने स्वतः च आपल्याला ट्रोल केलं आहे. अभिनेत्रीने आपल्या फोटोसोबत आणखी एक मजेशीर फोटो शेअर केला आहे.
अनन्या पांडेनं स्वतः आपल्या फोटोंसोबत एका सफरचंदचा फोटोदेखील शेअर केला आहे.. यामध्ये ते सफरचंद एका पांढऱ्या जाळीमध्ये ठेवलेलं आहे.तिनं स्वतःची तुलना या फळाशी केली आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोंची तुलना विविध गोष्टींशी केली जात आहे. काहींनी तिच्या ड्रेसला मच्छरदाणी म्हटलं आहे.