जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sara Ali Khan: सारा अली खानने घेतलं महाकाल देवाचं दर्शन;भस्म आरतीनंतर केला एक तास ओम नमः शिवायचा जप

Sara Ali Khan: सारा अली खानने घेतलं महाकाल देवाचं दर्शन;भस्म आरतीनंतर केला एक तास ओम नमः शिवायचा जप

सारा अली खान उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचली आहे.

सारा अली खान उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचली आहे.

Sara Ali Khan At Mahakal Tmple Ujjain: सारा अली खान उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचली आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 मे- बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंगची लेक सारा अली खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री आपल्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सारा पहिल्यांदाच विकी कौशलसोबत पडद्यावर झळकणार आहे. सारा आणि विकी आपल्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. शिवाय चित्रपटाच्या यशासाठी आशीर्वाद घेण्यासाठी विविध धार्मिक स्थळांना भेटीसुद्धा देत आहेत. अशातच आता सारा अली खान उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचली आहे. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कलाकार विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन आशीर्वाद घेत असतात. अशातच आता अभिनेत्री सारा अली खानसुद्धा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली आहे. सारा अली खान उज्जैनमधील सुप्रसिद्ध महाकाल मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली आहे. यावेळी अभिनेत्री भस्म आरतीमध्येसुद्धा सहभागी झाली होती. अभिनेत्रींचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये सारा भक्तीत तल्लीन दिसून येत आहे. (हे वाचा: KK Death Anniversary: गायनापूर्वी ‘हे’ काम करत होता केके; ‘या’ गाण्याने बनवलं म्युझिक इंडस्ट्रीतील सुपरस्टार ) अमर उजालाच्या रिपोर्ट्सनुसार, महाकाल मंदिरमधील पुजारी संजय गुरु यांनी माहिती देत सांगितलं की, सारा अली खान ही महाकाल देवाची मोठी भक्त आहे. ती आपल्या कामातून वेळ मिळेल तेव्हा लगेच महाकाल देवाच्या दर्शनासाठी येत असते. दरम्यान आजसुद्धा सारा अली खान दर्शनासाठी आली होती. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, साराला आपली फ्लाईट चुकेल यांची अजिबात काळजी नव्हती. कारण तिला भस्म आरती आणि विविध पूजेमध्ये सहभागी व्हायचं होतं.

जाहिरात

पंडितजींनी सांगितलं की, सारा भस्म आरतीनंतर कोटी तीर्थ कुंडवरसुद्धा गेली होती. याठिकाणी अभिनेत्रीने तब्बल एक तास ओम नमः शिवायचा जप करत ध्यान केलं. त्यांनंतर सारा सायंकाळ आणि रात्रीच्या आरतीतसुद्धा सहभागी झाली होती. सारा रात्री साडे अकरानंतर इंदौरमधून आपल्या फ्लाईटसाठी रवाना होणार होती.

News18लोकमत
News18लोकमत

सारा अली खान ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. साराचे वडील अभिनेता सैफ अली खान मुस्लिम आणि आई अमृता सिंग हिंदू आहे. त्यामुळे सारा दोन्ही धर्माचा तितक्याच मनापासून आदर करते. साराने फारच कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात