मुंबई, 31 मे- केके अर्थातच कृष्णकुमार कुन्नथ हे म्युझिक इंडस्ट्रीतील फार मोठं नाव आहे. या गायकाने आपल्या प्रत्येक गाण्याने तरुणाईला भुरळ पाडली आहे. केके चं प्रत्येक गाणं श्रोत्यांना एक जादुई अनुभव देतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. लोकप्रिय गायक केकेच्या अचानक निधनाने सेलिब्रेटींसह चाहत्यांना धक्का बसला होता. आजही लोक त्या धक्क्यातून सावरले नाहीयेत. दरम्यान आज केकेचा पहिला स्मृतिदिन आहे.गायकाला या जगातून जाऊन एक वर्ष झाला यावर अद्याप कोणाचाही विश्वास बसत नाहीय. ‘केके’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णकुमार कुन्नथ यांचं गेल्यावर्षी आजच्याच दिवशी म्हणजे ३१ मे रोजी निधन झालं होतं. ते 53 वर्षांचे होते. कृष्णकुमार कुन्नाथ एका कॉन्सर्टसाठी कोलकात्यात गेले होते. चालू कार्यक्रमात ते अचानक कोसळले, त्यानंतर त्यांना तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. केकेच्या अचानक जाण्याने सर्वांनांच धक्का बसला होत. केके आजही आपल्या चाहत्यांच्यामध्ये आपल्या आवाजाच्या माध्यमातून जिवंत आहे. (हे वाचा: KKK13: ‘खतरों के खिलाडी’मध्ये शॉकिंग एलिमिनेशन? बिग बॉस फेम स्पर्धक शोमधून बाहेर ) भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात अष्टपैलू गायकांपैकी एक अशी केकेची ओळख आहे.केके यांनी हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. केकेच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीबाबत सांगायचं तर, त्याने ‘माचीस’ चित्रपटातील ‘छोड आये हम’ या गाण्याने पदार्पण केलं होतं. ‘हम दिल दे चुके सनम’मधील ‘तडप तडप के इस दिल से आह निकलती रही’, ‘गँगस्टर’मधील ‘तू ही मेरी’, बजरंगी भाईजानमधील ‘तू जो मिला’, देवदासमधील ‘डोला रे डोला’ हे त्यांच्या उत्कृष्ट गाण्यांची काही नावे आहेत. ‘या’ गाण्याने केकेला बनवलं म्युझिक इंडस्ट्रीतील सुपरस्टार- केकेने गायनाचं कोणतंही अधिकृत शिक्षण घेतलेलं नाहीय. चित्रपटांमध्ये गाण्यापूर्वी केके जिंगल्स बनवण्याचं काम करत होता. 2000मध्ये आलेल्या सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या ‘हम दिल दे चुके सनम’मधील ‘तडप तडप के इस दिल से आह निकलती रही’ या गाण्याने केकेच्या करिअरला शिखरावर पोहोचवलं होतं. या गाण्यासाठी केकेला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होत. इथून गायकाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या यशस्वी करिअरची गाडी सुसाट सुटली होती.
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट गायकांमध्ये केकेच्या नावाचा समावेश होतो. ते ‘मेलोडी किंग’ म्हणून ओळखले जात होते. 2000 च्या दशकात केके बॉलिवूडचा सर्वात महागडा गायकदेखील होता. अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. KK च्या आवाजाने अनेक स्टार्सना सुपरस्टार बनवलं आहे. त्याने सलमान खान ते हृतिक आणि इमरान हाश्मी सारख्या स्टार्ससाठी अनेक गाणी गायली आहेत. इमरान हाश्मीच्या गाण्यांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. केकेच्या आवाजामुळे हे शक्य झालं आहे.