जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: पॅपाराझींवर सारा अली खान भडकली, गाडीचा दरवाजा तोंडावर केला बंद; फोटोसाठी पोज देण्यासही नकार

VIDEO: पॅपाराझींवर सारा अली खान भडकली, गाडीचा दरवाजा तोंडावर केला बंद; फोटोसाठी पोज देण्यासही नकार

VIDEO: पॅपाराझींवर सारा अली खान भडकली, गाडीचा दरवाजा तोंडावर केला बंद; फोटोसाठी पोज देण्यासही नकार

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan Latest News) अनेकदा पॅपाराझी आणि फोटोग्राफर्सना पोज देताना दिसते. पण आता समोर आलेला व्हिडीओ काहीसा वेगळाच आहे. अभिनेत्री सारा पॅपाराझींवर चिडल्याचे पाहायला मिळाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 एप्रिल: अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan Latest News) अनेकदा पॅपाराझी आणि फोटोग्राफर्सना पोज देताना दिसते. पण आता समोर आलेला व्हिडीओ काहीसा वेगळाच आहे. अभिनेत्री सारा पॅपाराझींवर चिडल्याचे (Sara Ali Khan Viral Video) पाहायला मिळाले. ती याच रागात कारमध्ये बसते आणि दरवाजा बंद करुन घेते. यावेळी सारा शांतपणे तिचा राग (Sara Ali Khn got Angry) व्यक्त करते पण कोणतीही पोज देण्यास यावेळी ती स्पष्टपणे  नकार देते. सारा तिच्या प्रोजेक्टच्या सेटवरुन बाहेर येत असताना हा प्रकार घडला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. सारा तिच्या शूटिंगच्या सेटवरुन बाहेर पडताना फोटोग्राफर्सची गर्दी होते. यादरम्यान एकजण साराला धडकतो आणि त्यामुळे सारा गडबडीत गाडीत जाऊन बसते. त्यानंतर ती फोटोज काढण्यासाठी पोज देत नाही. पॅपाराझींनी फोटो काढण्यासाठी विनंती केल्यानंतर ती म्हणजे की मग तुम्ही धक्का मारता. अशाप्रकारे वैतागल्याचा साराचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना कपूर हिचा देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ज्यामध्ये ती पॅपाराझी फोटोग्राफर्सवर भडकल्याचे दिसून आली होती. हे वाचा- तीन महिन्यानंतर प्रियांका-निकच्या लेकीचं समजलं नाव, असा आहे नावाचा अर्थ साराचा हा व्हिडीओ Viral Bhayani पेजवरुन देखील शेअर करण्यात आल्या आहे. त्यावेळी साराची प्रतिक्रिया साहाजिकच होती, अशा आशयाच्या कमेंट्स अनेक युजर्सनी केल्या आहे.  साराने शांतपणे पॅपाराझींना रिप्लाय दिल्याचे पाहूनही तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. ‘ती खूप गोड आहे, तिला धक्का लागला तरी तिने शांतपणे नकार दिला’ अशा कमेंट्स अनेक युजर्सनी केल्या आहेत.

जाहिरात

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास सारा शेवटचे अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासह ‘अतरंगी रे’  (Atrangi Re) या सिनेमात दिसली होती. सारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित एका सिनेमात लवकरच दिसणार आहे, या सिनेमाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. याशिवाय ती विकी कौशलसह देखील एक चित्रपट करत आहे, या सिनेमाचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तर सारा ‘नखरेवाली’ आणि ‘गॅसलाइट’ सिनेमातही दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात