जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Koffee With Karan 7:महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवंडांसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या सारा-जान्हवी? नाव वाचून बसेल धक्का

Koffee With Karan 7:महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवंडांसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या सारा-जान्हवी? नाव वाचून बसेल धक्का

Koffee With Karan 7:महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवंडांसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या सारा-जान्हवी? नाव वाचून बसेल धक्का

‘कॉफी विथ करण’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोपैकी एक आहे. या शोमध्ये बॉलिवूडमधील (Bollywood) जवळजवळ सर्वच सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. या शोमध्ये कलाकार त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल बोलताना दिसतात.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 16 जुलै-  ‘कॉफी विथ करण’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोपैकी एक आहे. या शोमध्ये बॉलिवूडमधील (Bollywood) जवळजवळ सर्वच सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. या शोमध्ये कलाकार त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल बोलताना दिसतात. करणने विचारलेल्या अनेक ट्रिकी प्रश्नांची उत्तरं हे कलाकार देतात. या शोमध्ये अनेक कलाकारांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासेही केले आहेत. ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये दोन बेस्टफ्रेंड्स सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांनी हजेरी लावली. या शोमध्ये त्या त्यांच्या डेटिंगच्या अफवा आणि इतर अनेक विषयांवर गप्पा मारताना दिसल्या. दुसऱ्या एपिसोडमध्ये जेव्हा करण जोहरने सारा अली खान आणि जान्हवी कपूरला सांगितलं की त्या दोघींनी दोन सख्ख्या भावांना डेट केलं होतं, तेव्हा सारा आणि जान्हवी चकित झाल्या. “मी कोरोना साथीच्या आधीचं बोलतोय. मला आज तुमची फ्रेंडशीप लेव्हल माहीत नाही; पण मला आठवतंय की तुम्ही दोघींनी दोन भावांना आधी डेट केलंय. खरं तर तो तुमचा पास्ट होता. पण तुम्ही दोघींनी दोन भावांना डेट केलं होतं आणि आम्हा तिघांमध्ये साम्य म्हणजे ते दोघे माझ्या बिल्डिंगमध्ये राहायचे,” असं करण म्हणाला. करणने हे सांगताच सारा आणि जान्हवी चकित झाल्या होत्या. या संदर्भात पिंकव्हिलाने वृत्त दिलंय.

    News18

    करणच्या का खुलाशानंतर सारा आणि जान्हवी यांनी डेट केलेली ही भावांची जोडी कोणती, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. रिपोर्ट्सनुसार हे दोघे भाऊ वीर (Veer Pahariya) आणि शिखर पहारिया (Shikhar Pahariya) आहेत. हे दोघेही एका श्रीमंत, राजकीय कुटुंबातील आहेत आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) हे त्यांचे आजोबा आहेत. त्यांचे वडील संजय पहारिया हे मुंबईतील एक बिझनेसमन आहेत. वीर आणि शिखर दोघेही सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती पहारियाची मुलं आहेत. स्मृती यांनी 2008 मध्ये संजय पहारिया यांना घटस्फोट दिला. स्मृती यांनी पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्या त्यांच्या वडिलांसोबत राहायला गेल्या. त्यामुळे या भावांनी त्यांचं बालपण दिल्लीत घालवलं. **(हे वाचा:** Sushmita Sen-Lalit Modi: सुष्मिता सेनला डेट करणाऱ्या ललित मोदींच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रींना देतेय टक्कर ) वीर 28 वर्षांचा असून त्याने दुबईतून शिक्षण पूर्ण केलं. त्याने आपल्या करिअरची सुरुवात भारतात Viacom18 साठी काम करून केली. तर 23 वर्षीय शिखर धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल (Dhirubai Ambani International School ) आणि बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये (Bombay Scottish School) शिकला. त्यानंतर त्याने लंडनच्या रीजेंट युनिव्हर्सिटीमधून (Regent University, London) शिक्षण घेतलं. नंतर वीर आणि शिखर या दोन्ही भावांनी 2018 मध्ये एकत्र येत ‘इंडिया वाईन’ (India Wyn) हा गेमिंग आणि एंटरटेनमेंट बिझनेस सुरू केला. कोरोना महामारी यायच्या आधी साराने वीरला डेट केलं होतं, तर जान्हवीने शिखरला डेट केल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास सारा अली खान विक्रांत मॅसीसोबत ‘गॅसलाइट’ नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. तर, जान्हवी कपूर ‘गुड लक जेरी’मध्ये दिसणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात