नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : अभिनेत्री पायल घोषने (payal ghosh) दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (anurag kashyap) आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली. 2014 साली अनुराग कश्यपने आपल्यासह जबरदस्ती केली होती, असं पायलने सांगितलं आहे. इतक्या वर्षांनंतर पायल घोष व्यक्त झाली आहे. नेमकं तिच्यासह अनुरागने काय केलं होतं. ते तिनं एका मुलाखतीत सांगितलं आहे.
झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत पायलने अनुराग कश्यपने आपल्यासह काय काय केलं हे सविस्तर सांगितलं आहे. तिने त्या घटनेचा पूर्णपणे उलगडा केला आहे.
पायल म्हणाली, "मी अनुराग यांना भेटायला त्यांच्या यारी रोड इथल्या ऑफिसमध्ये गेली होती. ते दुसऱ्या कुणाशी तरी बोलत होते म्हणून मी पुन्हा आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि बोलावलं. काही ग्लॅमरस घालू नको जेणेकरून मी अभिनेत्री वाटेन असं त्यांनी सांगितलं. मग मी सलवार कमीज घालून त्यांना भेटायला गेला. त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी जेवण बनवलं, आमचं जेवण झाल्यानंतर त्यांनी माझी जेवणाची प्लेटही उचलली. त्यानंतर मी तिथून निघून आले. त्यांनी मला पुन्हा मेसेज करून बोलावलं. मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता म्हणून मी त्यांना भेटायला नाही येऊ शकत असं सांगितलं"
हे वाचा - दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप करणारी पायल घोष आहे तरी कोण?
यानंतर दोन-तीन दिवसांनी आपण अनुराग यांना पुन्हा भेटलो, यावेळी आपण त्यांच्या घरी गेलो असं पायलनं सांगितलं.
पायल म्हणाली, "त्यांनी मला घरी बोलावलं होतं. ते स्मोकिंग करत होते, मी तिथं बसले होते. काही वेळानंतर त्यांनी मला दुसऱ्या खोलीत नेलं. तिथं त्यांची पत्नी कल्की कोचलिनच्या खूप चपला होत्या, ते दाखवत त्यांनी मला सांगितलं, माझी पत्नी माझ्यावर रागावली आहे, ती अमेरिकेला गेली आहे. त्यानंतर अनुराग यांनी मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक ते माझ्यासमोर न्यूड झाले आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्यांना म्हटलं मला कन्फर्टेबल वाटत नाही आहे"
"मी ज्या अभिनेत्रींसह काम केलं आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असं अनुराग मला म्हणाले. मी पुन्हा त्यांना सांगितलं, मला अस्वस्थ वाटतं आहे, मला बरं नाही वाटत आहे. काही तरी करून मी तिथून कसेबसे पळाले. त्यानंतर मी त्यांना कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावलं. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो", असं पायल म्हणाली.
हे वाचा - "डान्स करता करता त्यांची जीभ...", पायल घोषनंतर कंगना रणौतने केला धक्कादायक आरोप
पायल पुढे म्हणाली, "मी काय करू मला काहीच समजत नव्हतं. माझ्या मित्रांनी मला सांगितलं, पोलिसात तक्रार कर पण मी नाही केली. मी खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला मात्र माझ्या कुटुंबाने आणि जवळच्या मित्रांनी मला गप्प राहायला सांगतिलं. त्यांना माझ्या भविष्याची चिंता होती. मीटू कॅम्पेन सुरू झाल्यानंतरही माझं कुटुंब, मॅनेसजरसह इंडस्ट्रीतील अनेकांनी मला गप्प राहण्यासाठी सांगितलं. कारण यामुळे माझं करिअर उद्ध्वस्त होईल, अशी भीती वाटत होती"
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress