जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / एक दोन नाही तर 6 अभिनेत्रींसोबत होतं अफेअर; तरी शेवटी आयुष्यभर एकटाच राहिला अभिनेता

एक दोन नाही तर 6 अभिनेत्रींसोबत होतं अफेअर; तरी शेवटी आयुष्यभर एकटाच राहिला अभिनेता

वयाच्या 47 व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे संजीव कुमार आयुष्यभर बॅचलर राहिले.

वयाच्या 47 व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे संजीव कुमार आयुष्यभर बॅचलर राहिले.

आयुष्यात तब्बल 6 अभिनेत्रींसोबत संजीव कुमारचे नाव जोडले गेले पण त्यांना शेवट्पर्यंत प्रेम मिळू शकले नाही. वयाच्या 47 व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे संजीव कुमार आयुष्यभर बॅचलर राहिले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 जून:  1970-80 च्या दशकात राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांसारख्या सुपरस्टार्सच्या उपस्थितीत संजीव कुमार यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तो असा अभिनेता होता जो प्रत्येक प्रकारची व्यक्तिरेखा अतिशय गांभीर्याने साकारत असे. त्यांनी अमिताभच्या वडिलांची भूमिकाही चोख बजावली होती. ‘शोले’मधील जय-वीरूपेक्षा ठाकूर म्हणजेच संजीव कुमारला जास्त प्रशंसा मिळाली. पडद्यावर प्रत्येक पात्र उत्कटतेने साकारणारे संजीव कुमार वैयक्तिक आयुष्यात नेहमीच एकटे राहिले. ते प्रेमात पडले  नाहीत  किंवा त्यांना  प्रेम मिळाले नाही असे नाही पण नशिबाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. हेमामालिनी, नूतन, सुलक्षणा पंडित, शबाना आझमी, सायरा बानू, नीता मेहता या अभिनेत्रींसोबत संजीव कुमारचे नाव जोडले गेले पण त्यांना शेवट्पर्यंत प्रेम मिळू शकले नाही. वयाच्या 47 व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे संजीव कुमार आयुष्यभर बॅचलर राहिले. हेमा मालिनी यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा संजीव यांना सुपरस्टारचा दर्जा मिळाला होता. संजीवने हेमाला लग्नासाठी प्रपोजही केले होते. पण संजीवच्या एका अटीमुळे आणि त्याच्या विचारसरणीमुळे लग्न होऊ शकले नाही. हेमा मालिनी मोकळ्या मनाच्या होत्या आणि त्यांना बॉलीवूडमध्ये मोठे नाव कमवायचे होते, तर संजीव कुमार यांना एक आज्ञाधारक गृहिणी हवी होती जी घरी राहून आईची सेवा करेल. संजीवच्या या मानसिकतेमुळे हेमा त्याच्यापासून दूर गेली आणि धर्मेंद्रला डेट करायला सुरुवात केली.

News18लोकमत
News18लोकमत

त्या काळातील सुंदर अभिनेत्री सुलक्षणा पंडित संजीव कुमारच्या प्रेमात होती. सुलक्षणाने 1975 साली ‘उलझान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि या चित्रपटात तिच्या विरुद्ध संजीव कुमार होते. सुलक्षणा या अभिनेत्यावर प्रेम करायची. पण हेमाच्या नकारानंतर संजीव सुलक्षणाला प्रेम देऊ शकले नाहीत. संजीव तिला मैत्रिणीप्रमाणे वागवू लागले पण सुलक्षणाला त्याच्यासोबत कायम राहायचे होते. संजीवच्या मृत्यूनंतर सुलक्षणा अनेक दिवस डिप्रेशनमध्ये होती. सुपरस्टार होती करीना-करिश्माची आई; लग्नानंतर करिअर सोडलं अन् मिळाला धोका; 35 वर्ष राहिली नवऱ्यापासून दूर संजीव कुमार यांनी स्वतः शबाना आझमी यांच्याविषयीचं प्रेम व्यक्त केले होते. पण संजीव कुमारच्या आईमुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही. शबाना मुस्लिम होती आणि संजीवच्या आईला अभिनेत्याने दुसऱ्या धर्मात लग्न करावे असे वाटत नव्हते. एकेकाळी सायरा बानो आणि संजीव कुमार यांच्या प्रेमाच्या चर्चा होत्या. पण इथेही धर्म आणि संजीव कुमारची आई प्रेमाच्या आड आली. मैं तुलसी तेरे आगन की अभिनेत्री नीता मेहता यांचेही संजीव कुमारसोबत अफेअर होते. नीताने संजीव कुमारसोबत ‘जानी दुश्मन’, ‘पत्थर से टक्कर’ आणि ‘हिरो’ सारख्या चित्रपटात काम केले. शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले. दोघांमध्ये लग्नाची चर्चाही झाली होती, पण संजीवच्या अटीमुळे हे लग्न होऊ शकलं नाही. खरे तर नीताने लग्नानंतरही चित्रपटात काम करावे असे संजीव कुमार यांना वाटत नव्हते. दोघे वेगळे झाल्यानंतर नीता यांनी नंतर चित्रपटांकडे पाठ फिरवली आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.

News18

नूतन 1960-70 च्या दशकात बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री होत्या. त्यांच्याकडे पाच फिल्मफेअर पुरस्कार आहेत. एक वेळ अशीही आली जेव्हा नूतनचे नाव संजीव कुमार यांच्यासोबत जोडले जाऊ लागले. चित्रपटातील गॉसिप्समध्ये दोघांच्या नावाची चर्चा सुरू झाली. नूतनच्या पतीला हा प्रकार कळताच तो संतापला. दरम्यान, ‘देवी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नूतनने संजीव कुमार यांना थप्पड मारली होती. संजीवने खोट्या नात्याची अफवा पसरवल्याचा नूतनचा विश्वास होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात