मुंबई, 26 जुलै: प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘टाइमपास 3’ हा सिनेमा सज्ज झाला आहे. ‘टाइमपास’ आणि ‘टाइमपास 2’ या दोन्ही सिनेमांच्या दमदार यशानंतर तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिसरा भाग प्रत्यक्षात दुसरा भाग आहे. प्राजू दगडूच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर शिक्षणाच्या ब्रिज क्रास करताना दगडूच्या आयुष्यात आलेल्या पालवीची गोष्ट ‘टाइमपास 3’ मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे टाइमपास 3मध्ये पालवीची जबरदस्त भूमिका साकारणार आहे. सिनेमात जुन्या पात्रांसह काही नवीन पात्र देखील पाहायला मिळणार आहे. त्यातील एक पात्र पालवी आणि दुसरं म्हणजे पालवीचे फफ्फा. अभिनेता संजय नार्वेकरनं पालवीच्या पप्पाची खतरनाक भूमिका साकारली आहे. अनेक दिवसांनी संजय नार्वेकर नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आले आहेत. टाइमपास 3 मध्ये संजन नार्वेकर दिनकर पाटील ही भूमिका साकारणार आहे. दगडूच्या आयुष्यात आलेल्या पालवीचे ते पप्पा आहेत. पण स्वत:ला ते पालवीचे फफ्फा म्हणवून घेतात. दिनकर पाटील हा भाईलोकांचा भाई असून एरियाचा डेंजर डॉन म्हणून ओळखला जातो. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये संजय नार्वेकरांचा खतरनाक अंदाज आपल्याला पाहायला मिळला आहे. हेही वाचा - Swarda Thigale: ‘स्वत:चं कायमचं सुखाचं ठिकाण’; स्वराज्य सौदामिनी फेम स्वरदा ठिगळेनं घेतलं नवं घर खिशात बंदूका घेऊन फिरणाऱ्या पालवीच्या फफ्फाला पाहून दगडूची हवा टाइड होते. एकूणच धमाकेदार पात्र सिनेमा पाहायला मिळणार आहेत आणि प्रेक्षकांचीही सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
टाइमपास 3 चा कॅप्टन ऑफ द शीप निर्माता दिग्दर्शक रवी जाधवनं पालवीच्या फफ्फाचं भन्नाट वर्णन करत एका खास पोस्ट शेअर केली आहे. रवी जाधवनं म्हटलंय, ‘टाइमपासच्या फॅमिलीत नया है यह! पन कॅरेक्टरमधी खतरनाक है यह! पालवीचा फफ्फा है यह! येतोय भाईलोकांचा भाई, दिनकर पाटील. भेटा डेंजर डॉन दिनकर पाटीलला 29 जुलैपासून सिनेमागृहात’. ‘जहा गलती वहा गळती’ हा पालवीच्या फफ्फचा दमदार डायलॉग प्रेक्षकांच्याही पसंतीस पडला आहे. आता पालवी आणि दगडूच्या प्रेमात हा डेंजर डॉन दिनकर पाटील काय राडा घालणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना 29 जुलैची वाट पाहावी लागणार आहे. टाइमपास 3 मध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे, प्रथमेश परब यांच्यावर चित्रीत करण्यात आलेली ‘वाघाची डरकाळी’, ‘साई तुझं लेकरू’, ‘लव्हेबल’ ही भन्नाट गाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टाइमपास आणि टाइमपास 2 प्रमाणेच टाइमपास 3 ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही.