Home /News /entertainment /

अरे आओ ना फिर! संजय जाधव स्वतःच्या सिनेमासाठी झाला डान्सर; करतोय अफलातून प्रमोशन

अरे आओ ना फिर! संजय जाधव स्वतःच्या सिनेमासाठी झाला डान्सर; करतोय अफलातून प्रमोशन

‘तमाशा live’ (Tamasha Live movie director) या सिनेमाचे दिग्दर्शक सुद्धा आता फिल्मचं तगडं प्रमोशन करायला मैदानात उतरले असून त्यांच्या या अनोख्या प्रमोशनच्या पद्धतीचं भयानक कौतुक होत आहे.

  मुंबई 4 जुलै: अरे आओ ना फिर! अशा आपल्या खास डायलॉगसाठी प्रसिद्ध असणारा दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) अर्थात इंडस्ट्रीचा संजय दादा आता दिगदर्शन सोडून चक्क नाच करताना दिसत आहे. आधी दिग्दर्शन, छायाचित्रण आता अभिनय आणि त्याही पुढे जाऊन आता नृत्य अशा सगळ्या रूपात संजय जाधव दिसून येत आहे. पण तो प्रोफेशनली डान्सर झाला नसून त्याचाच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने ही आगळीवेगळी शक्कल लढवली आहे. संजय जाधव दिग्दर्शित (Tamasha Live) ‘तमाशा live’ हा सिनेमा येत्या 15 जुलै ला रिलीज होणार आहे. दोन पत्रकारांमधली झुंज घेऊन संजय जाधव दाखल होणार आहेत. प्रसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्या दोन पत्रकारांमध्ये एक खूप मोठी झुंज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सध्या या सिनेमाच्या प्रमोशनची बरीच चर्चा होताना दिसत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) सुरु केलेलं गिरकी चॅलेंज मोठा आकार घेताना दिसत आहे. Conviction का पैसा है! असं म्हणणारा हा दिग्दर्शक भलतंच convincing नृत्य करताना (Sanjay Jadhav unique promotion) दिसत आहे. सिनेमातील इतर स्त्री कलाकार आणि विशेष करून त्याची (Sanjay Jadhav daughter) मुलगी ध्रीती या गाण्यावर बाबांसोबत ताल धरताना दिसत आहे. अनेक गोपिकांमध्ये असणारा एक एकटा कृष्ण यांच्यासोबत उठून दिसत आहे. अनेकांनी या चॅलेंज नंतर संजय दादाच्या डान्स स्किलचं कौतुक केलं आहे.
  सिनेमातील कलाकार हेमांगी कवीने या व्हिडिओवर कमेंट करून ‘आत्तापर्यंतचा बेस्ट विडिओ होता’ असं म्हणलं आहे. तर सोनाली सुद्धा ‘बाप रे बाप! हे कम्माल आहे’ असं म्हणते. त्याशिवाय अनेक कलाकारांच्या डोळ्याचं पारणं आज संजय दादाला नाचताना बघून फिटलं अशा गमितदार पण प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. हे ही वाचा- Dr. Aroda webseries: आता गुप्त रोगांवर बिनधास्त बोला; सोनी लिव्हची नवी सिरीज मांडणार महत्त्वाचा विषय
   सध्या हे ‘रंग लागला’ गाण्याचं चॅलेंज खूप लोकप्रिय होत आहे. अनेकजण आणि स्वतः सोनालीसुद्धा तुफान रील्स बनवून या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. नुकतंच सोनाली आणि फुलवा या गाण्यावर लंडनच्या टाऊन ब्रिजवर नाचताना दिसल्या. महाराष्ट्राबाहेर जाऊन थेट राणीच्या देशात त्यांनी प्रमोशनचा अनोखा घाट घातला. सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या या प्रमोशन स्ट्रॅटेजीचं सुद्धा कौतुक होताना दिसत आहे. संजय जाधव यांच्या या सिनेमाचा आज ट्रेलर आला असून बरीच उत्सुकता वाढवून ठेवण्यात टीम यशस्वी झाली आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Film, Marathi cinema, Promotions, Sonalee Kulkarni

  पुढील बातम्या