Home /News /entertainment /

बापरे! अभिनेत्रीला भेटण्यासाठी पठ्ठ्या चक्क 51 मजले चढला; कियरानं सांगितली भन्नाट Fan Moment

बापरे! अभिनेत्रीला भेटण्यासाठी पठ्ठ्या चक्क 51 मजले चढला; कियरानं सांगितली भन्नाट Fan Moment

सुपरस्टार शाहरुख खान, बॉलीवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी फॅन्स त्यांच्या बंगल्यासमोर मोठी गर्दी करतात, हे आपण अनेकदा पाहतो. अभिनेत्री कियारा आडवाणीच्या एका चाहत्यानं तिला भेटण्यासाठी हा चाहता कियाराच्या इमारतीचे अनेक मजले चक्क पायी चढून गेला.

पुढे वाचा ...
मुंबई, 04 जुलै: बॉलीवूड सेलेब्रिटी (Bollywood Celebrities) त्यांच्या रोजच्या जीवनातल्या व्यावसायिक, खासगी घडामोडी, खास क्षण तसंच विशिष्ट गोष्टी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सातत्यानं शेअर करत असतात. या माध्यमातून फॅन्ससोबत कनेक्ट राहणं हा त्यांचा उद्देश असतो. फॅन्सदेखील अशा पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात. काही फॅन्स आपल्या आवडत्या अभिनेत्री, अभिनेत्यावर विशेष प्रेम करतात. आपल्या आवडत्या सेलेब्रिटीला प्रत्यक्ष भेटावं, काही क्षण त्यांच्या सोबत घालवावेत अशी बहुतांश फॅन्सची (Fans) इच्छा असते. काही फॅन्स या गोष्टींसाठी कोणत्याही थराला गेल्याचं आपण अनेकदा ऐकतो, वाचतो. बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीला (Actress Kiara Advani) भेटण्यासाठी तिच्या एका चाहत्यानं एक विचित्र गोष्ट केली. कियारानं नुकतीच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली. 'त्या चाहत्यानं केलेली गोष्टी माझ्यासाठी खूप गोड; पण भीतीदायक होती', असं कियारानं सांगितलं. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे. सुपरस्टार शाहरुख खान, बॉलीवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी फॅन्स त्यांच्या बंगल्यासमोर मोठी गर्दी करतात, हे आपण अनेकदा पाहतो. अभिनेत्री कियारा आडवाणीच्या एका चाहत्यानं तिला भेटण्यासाठी हा चाहता कियाराच्या इमारतीचे अनेक मजले (Floors) चक्क पायी चढून गेला. 'चाहत्याच्या या कृतीमुळे मी क्षणभर घाबरून गेले होते; पण चाहत्याची ही कृती खूप गोड होती', असं कियारा म्हणते. सध्या कियाराचा 'जुग जुग जियो' (Jug Jugg Jiyo) हा चित्रपट थिएटरमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून जोरदार कलेक्शन करत आहे. कौटुंबिक विषयावर आधारित कथानक असेलल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं आतापर्यंत बॉक्स ऑफिस 60 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. कियारा लवकरच 'गोविंदा मेरा नाम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत आहेत. हेही वाचा - गौरी झाली शिर्केपाटलांच्या घरची खरी मालकीण! मिळाला सिंहासनावर बसण्याचा मान; आता काय करणार शालिनी ? कियारा आडवाणी मुंबईतल्या (Mumbai) महालक्ष्मी भागात राहते. ती ज्या बिल्डिंगमध्ये राहते, ती बिल्डिंग 51 मजली आहे. तिचं घर सुरुवातीच्या मजल्यांवर नक्कीच नसेल असा विश्वास चाहत्याला होता. त्यामुळे कियाराला भेटण्यासाठी हा चाहता चक्क अनेक मजले चढून गेला. तुला भेटण्यासाठी एका तरुणानं एक विचित्र गोष्ट केली होती, त्याबद्दल तू काय सांगशील असा प्रश्न कियाराला एका मुलाखतीत विचारला गेला. त्यावर कियारानं `पिंकव्हिला`शी बोलताना सांगितलं, 'माझ्यासाठी चाहत्यानं एक विचित्र गोष्ट केली. मी नेमक्या कोणत्या मजल्यावर राहते हे मी सांगणार नाही. मी खरं तर अगदी वरच्या मजल्यावर राहते. मला भेटण्यासाठी तो चाहता सर्व मजले पायी चढून आला. तो माझ्या घरी पोहोचला तेव्हा खूप घामाघूम झाला होता. तू ठिक आहेस ना? तुला बसायचं आहे का? तुला पाणी हवं आहे का?',  असे प्रश्न मी त्याला विचारले. 'चाहत्याचा मला भेटण्याचा हा प्रयत्न खूप गोड होता, पण क्रेझी आणि भीतीदायक होता. मी त्या चाहत्याला काही प्रश्न विचारले',  असं कियारा म्हणाली. त्यावर तो म्हणाला, 'मी पायऱ्या चढून आलो आहे. तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात, हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे'.  पायऱ्या चढून येण्यामागं कारण काय? तू लिफ्टनं येऊ शकला असतास, असा प्रश्न कियारानं त्याला विचारला. त्यानंतर कियाराच्या मनात अनेक प्रश्न आले. त्यावर कियारानं त्याला ठीक आहे. परंतु, आता तू माझ्या घरी परत येऊ नकोस. अशा पद्धतीनं येणं मला भीतीदायक वाटतं असं सांगितलं. 'हा चाहता खूप गोड होता. परंतु, दुसऱ्या बाजूनं विचार केला तर त्याची ही कृती वेडेपणाची होती. तो एक सुंदर व्यक्ती आणि चांगला माणूस होता',  असं कियारानं मुलाखतीत सांगितलं.
First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News

पुढील बातम्या