नवी दिल्ली, 17 मार्च : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या वेगळ्या कारणामुळं चर्चेत आला आहे. संजय दत्तचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांच्यासोबत दुबईमध्ये (Dubai) दिसत आहे. हे पाहिल्यानंतर लोकांकडून या भेटीविषयी प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जाणून घेऊ लोकांच्या प्रतिक्रिया.
2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) संबंध पूर्वीसारखे राहिले नाहीत. पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. तिथल्या स्टार्ससोबत काम करण्याविषयी कडक निर्बंध लागू झाले. दोन्ही देशांमधील हा तणाव आजही कायम आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचा खलनायक म्हणजेच संजय दत्तचे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांच्यासोबतचे फोटो समोर आले तर लोकांची पहिली प्रतिक्रिया काय असेल?
हे वाचा - भारतानं क्षेपणास्त्र डागल्यानंतर पाकिस्तान उचलणार होता हे धोकादायक पाऊल!
संजय दत्त-परवेझ मुशर्रफ भेटीवर उपस्थित झाले प्रश्न
संजय दत्तचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो परवेझ मुशर्रफ यांना भेटताना दिसत आहे. दोघांची ही भेट दुबईत झाली. हा व्हायरल फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी संजय दत्त आणि मुशर्रफ यांची भेट जिममध्ये झाल्याचं म्हटलं आहे. काहींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. काहींना वाटतं की, त्यांची सहज भेट झाली असावी. फोटोमध्ये परवेझ मुशर्रफ (जे सध्या दुबईत राहतात) व्हीलचेअरवर बसले आहेत. तिथेच संजय दत्त कोणाशी तरी बोलताना दिसत आहे.
یہ بھی کبھی ڈی چوک پر مکے لہرایا کرتے تھے pic.twitter.com/i1Sa3bkoST
— Mushtaq Minhas (@mushtaqminhas) March 16, 2022
हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. परवेझ मुशर्रफ आणि संजय दत्त एकत्र येणं अनेकांना आवडले नाही. एका यूजरनं लिहिलंय - हुकूमशहा जनरल मुशर्रफ संजय दत्तसोबत हँग आउट करत आहेत. काय चालू आहे? एका व्यक्तीनं लिहिलंय - कारगिलच्या मास्टरमाइंडसोबत बॉलिवूड अभिनेता काय करत आहे? संजयला ड्रग्ज, दारू, बंदुका आणि दाऊद इब्राहिम आवडतात.
हे वाचा - 'द कश्मीर फाइल्स या लिंकवर फ्रीमध्ये', असा SMS आला आहे? बँक खातं होईल रिकामं
संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, येत्या काळात तो अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अलीकडेच, संजयने दिल्ली आणि जयपूरमध्ये 'घुडचडी' चित्रपटाचं पहिलं शेड्यूल पूर्ण केलं. KGF Chapter 2 मध्ये तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. संजय दत्त शमशेरा, पृथ्वीराज या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan, Sanjay dutt