Home /News /national /

भारतानं क्षेपणास्त्र डागल्यानंतर पाकिस्तान उचलणार होता हे धोकादायक पाऊल!

भारतानं क्षेपणास्त्र डागल्यानंतर पाकिस्तान उचलणार होता हे धोकादायक पाऊल!

Missiles

Missiles

मार्चला भारताचं एक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या मियाँ चन्नू भागात पडलं. या क्षेपणास्त्रामुळं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण पाकिस्तानने 'ते' पाऊल उचललं असतं तर....

    नई दिल्ली, 16 मार्च :  भारतीय सुपरसॉनिक क्षेपणास्त्र (Indian supersonic missile) चुकून पाकिस्तानी हद्दीत कोसळल्याचं प्रकरण अद्याप संपलेलं दिसत नाही. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान (Pakistan) भारताच्या क्षेपणास्त्राच्या प्रत्युत्तरादाखल त्याच क्षमतेचं क्षेपणास्त्र भारतावर डागणार होता. मात्र, भारतीय क्षेपणास्त्र पडल्याच्या प्राथमिक तपासणीनंतर, पाकिस्तानला लक्षात आलं की हे क्षेपणास्त्र काही कारणानं चुकून कोसळलं (Indian missile crashed) आहे. त्यानंतर पाकिस्ताननं भारतावर क्षेपणास्त्र डागण्याचा निर्णय बदलला. 9 मार्चला भारताचं एक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या मियाँ चन्नू भागात पडलं. या क्षेपणास्त्रामुळं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, काही निवासी इमारतींचं नुकसान झालं आहे. भारतानं या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून नियमित देखभालीदरम्यान हे क्षेपणास्त्र चुकून डागल्याचं सांगितलं. भारतानंही याबाबत उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी या प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळं नाव न सांगण्याच्या अटीवर ब्लूमबर्गला सांगितलं की, क्षेपणास्त्र डागलं जाणं ही चूक होती. तरीही क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणानंतर, पाकिस्तानला याबाबत माहिती देण्यासाठी भारतानं दोन्ही बाजूंच्या लष्करी कमांडर्समध्ये थेट चर्चेसाठी हॉटलाइन वापरली नाही. त्याऐवजी, पुढील क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण टाळण्यासाठी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सर्व क्षेपणास्त्र प्रणाली बंद केल्या. हे वाचा - काश्मिरी पंडितांसाठी सरकारने काय केलं?The KashmirFilesवरुन सुप्रिया सुळेंचा सवाल या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी सांगितलं की, क्षेपणास्त्र प्रक्षेपणाबाबत भारताकडून कोणतंही स्पष्टीकरण न मिळाल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्ताननं याविषयीट ब्रीफिंग केलं. याच्या एका दिवसानंतर भारतानं आपलं क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानच्या हद्दीत आल्याचं कबूल केलं. पाकिस्तानचे लष्करी प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी रावळपिंडी इथं देशाच्या लष्करी मुख्यालयात पत्रकारांना घटनेची माहिती देताना सांगितलं की, पाकिस्तानचं हवाई दल भारतातून येणाऱ्या सुपरसॉनिक ऑब्जेक्टसवर सतत लक्ष ठेवून आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तान भारतीय क्षेपणास्त्राला प्रत्युत्तर देऊ शकला असता. पण आम्ही संयम दाखवला. या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी सांगितलं की, सर्व क्रूझ क्षेपणास्त्रांची लक्ष्यं निर्धारित केली गेली आहेत. परंतु, चुकून डागलेलं क्षेपणास्त्र त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू न शकल्यामुळं प्राणघातक ठरलं नाही. भारतीय अधिकारी अजूनही क्षेपणास्त्र कशामुळं डागलं गेलं, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हे वाचा - 'The Kashmir Files चित्रपट एक धडा...'; भाजप आमदार मोफत वाटणार सिनेमाची तिकिटं संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनीही क्षेपणास्त्र डागलं गेल्याबाबत संसदेत दिलं निवेदन क्षेपणास्त्र प्रकरणावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत वक्तव्य केलं आहे. 'ही अनावधानानं घडलेली घटना खेदजनक असून आमची क्षेपणास्त्र यंत्रणा अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे,' असं ते मंगळवारी राज्यसभेत म्हणाले. या घटनेची सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Imran khan, Missile, Pakistan

    पुढील बातम्या