Home /News /entertainment /

मुलाचा फोटो शेअर करत कुशल पंजाबीनं केली होती आत्महत्या

मुलाचा फोटो शेअर करत कुशल पंजाबीनं केली होती आत्महत्या

कुशलनं आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडिया अकाउंटवर मुलासोबतचा फोटो शेअर केला होता. ही त्याची शेवटची सोशल मीडिया पोस्ट ठरली. त्यानंतर दुसऱ्याचं दिवशी त्यानं आत्महत्या केली.

  मुंबई, 23 एप्रिल : सलमान खान, अक्षय कुमार, जॉन अब्राहमसारख्या बॉलिवूड अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या कुशलनं 26 डिसेंबरला 2019 ला गळफास घेत आत्महत्या केली. कुशल पंजाबी यांचा आज वाढदिवस. त्याचा जन्म 23 एप्रिल 1977 ला मुंबईमध्ये झाला होता. कुशल अवघ्या 37 वर्षांचा होता. त्याच्या अशा जाण्यानं त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला होता. त्यावेळी त्याची सुसाईड नोट आणि शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे खूपच खळबळ उडाली होती. कुशलनं आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडिया अकाउंटवर मुलासोबतचा फोटो शेअर केला होता. ही त्याची शेवटची सोशल मीडिया पोस्ट ठरली. त्यानंतर दुसऱ्याचं दिवशी त्यानं आत्महत्या केली. याशिवाय त्याच्या रुममध्ये एक दिड पानी सुसाईड नोट सापडली होती. ज्यात त्यानं आपल्या संपत्तीच्या वाटणीबद्दल लिहिलं होतं. तसेच आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये असं लिहिलं होतं. VIDEO : सारा अली खान म्हणते, 'मी विचित्र आहे कारण सैफ आणि अमृता...'
  View this post on Instagram

  ❤️

  A post shared by Kushal Punjabi. (@itsme_kushalpunjabi) on

  कुशलनं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल त्याच्या जवळच्या मित्रानं धक्कादायक खुलासे केले होते. त्याचे त्याच्या पत्नीशी वाद होत असतं आणि तिच्यापासून वेगळं होण्याच्या दुःखामुळे तो मागच्या काही दिवसांपासून खूप निराश आणि आजारी सुद्धा होता. असा खुलासा त्याच्या मित्रानं केला होता. मिथुन चक्रवर्तीच्या वडिलांचं मुंबईमध्ये निधन, बंगळुरूमध्ये अडकला अभिनेता कुशलनं नोव्हेंबर 2015 मध्ये युरोपीयन गर्लफ्रेंड Audrey Dolhen हिच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना 3 कियान नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. कुशलचं त्याच्या मुलावर प्रचंड प्रेम होत. मात्र पती-पत्नीतील वादांमुळे त्याची पत्नी आणि मुलगा सध्या संघाई येथे राहत होते. आत्महत्या करण्याच्या आधीच्या दिवशी कुशलनं कियानसोबतचा फोटो शेअर केला होता.
  कुशलनं त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. त्यानंतर त्यानं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं होतं. 'लव मॅरेज', 'सीआयडी', 'जिंदगी विन्स' या त्याच्या गाजलेल्या मालिका आहेत. याशिवाय सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत काही सिनेमातही त्यानं काम केलं होतं. (संपादन : मेघा जेठे.) अजय नसता तर शाहरुखशी लग्न केलं असतं का? चाहत्याला कजोलचं बिनधास्त उत्तर
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या