मुंबई,29 जानेवारी: KFG हा भारतीय सिनेसृष्टीतला बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. KGF - 1 हा चित्रपट संपूर्ण भारतभरात प्रचंड गाजला. केजीएफने कन्नड चित्रपटसृष्टीत 200 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या पहिल्या चित्रपटाचा मानही मिळवला. त्यामुळे चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता संजय दत्तने आता आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ह्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. संजय दत्तने ट्वीट करत लिहिलंय की,’वचन पाळले जाणार. आज संध्याकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी KGF Chapter 2 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल.”
The promise will be kept!#KGFChapter2 release date announcement today at 6.32pm.@TheNameIsYash @prashanth_neel @VKiragandur @hombalefilms @TandonRaveena @SrinidhiShetty7 @prakashraaj @BasrurRavi @bhuvangowda84 @excelmovies @VaaraahiCC @PrithvirajProd pic.twitter.com/p5plTqlmJ5
— Sanjay Dutt (@duttsanjay) January 29, 2021
केजीएफ चॅप्टर 1 (KGF Chapter 1) या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला कन्नड अभिनेता यशच्या 34व्या वाढदिवशी या चित्रपटाच्या सिक्वेलचा टीझर रिलीज करण्यात आला होता. रिलिजनंतर आतापर्यंत या व्हिडिओला 16 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
सत्ता संघर्षाची पहिल्या भागातील कथाच या दुसऱ्या भागात दिसते आहे. यशसोबतच संजय दत्त, रविना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी यांनीही या चित्रपटात भूमिका साकारलेल्या दिसत आहेत. रविना लाल रंगाची साडी नेसून दिसतेय, त्यामुळे तिनी राजकीय नेत्याची भूमिका साकारल्याचं स्पष्ट होतंय. संजय दत्त हातात तलवार घेऊन पाठमोरा उभा दिसतोय. या 2 मिनिटं 16 सेंकंदांच्या टिझरने अनेक चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.