मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

संजूबाबा येरवड्यात पोलिसांना रात्री 2 ला उठवायचा अन् हनुमान मंत्र म्हणायला बसायचा ते थेट...

संजूबाबा येरवड्यात पोलिसांना रात्री 2 ला उठवायचा अन् हनुमान मंत्र म्हणायला बसायचा ते थेट...

 संजय दत्तला बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळचे त्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यातील एक किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

संजय दत्तला बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळचे त्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यातील एक किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

संजय दत्तला बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळचे त्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यातील एक किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 29 मे- बॉलीवूडचा खलनायक संजय दत्त  (sanjay dutt )  त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. त्याचं जेलमध्ये जाणं असेल किंव्हा त्याची लव्ह अफेअर्स तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. संजय दत्तला बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळचे त्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक किस्सा किस्सा मेहता पब्लिकेशनच्या योजना यादव यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शेअर केला आहे. त्यांना हा किस्सा एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितला होता.

योजना यादव म्हणतात की, ''सोमवारी सांगलीहून पुण्याला ऑफिस गाठायचं तर पहाटमोडणीलाच साखरझोपेवर मिरची पेरावी लागते. स्वतःच्या झोपेची माती होते, इथवर ठिकेय, पण भाऊरायना मला सोडायला यावं लागतं. त्याच्याही झोपेची वाट लागते, याची आणखी सल बोचत राहते. साजिऱ्या वहिनीबाई चार वाजल्यापासून सावळ्या भाऊरायाला उठवायला लागतात. पण असं गाढ झोपेतून एखाद्याला उठवल्याचं पाप फार फार बोचत राहतं. आज असंच आवरून दारातून बाहेर पडतो, तोवर गेटच्या बाहेर एक काका बाईक काढताना दिसले. मी बंधुराजना विचारलं,"हे कोण आहेत रे?"

"पोलीस आहेत.""ते कुठं चाललेत विचारते थांब, विश्रामबागला सोडतील मला""योजे, मी सोडतो म्हणलोय ना. गप्प बस" भाऊ इतकं बोलेपर्यंतच मी गेटजवळ जाऊन त्यांना विचारलंही. ते राम मंदिरकडे चालले होते, पण मला बस स्टँडला सोडू शकतात म्हणाले. मी भावाला पुढं बोलायची संधीही न देता सरळ त्यांच्या बाईकवर बसले. आणि आम्ही निघालो. ते मदतीला धावून आले असल्यानं संवाद सुरू करायची जबाबदारी माझ्यावर होती. मी चौकशी केल्यावर तीन वर्षांपूर्वी त्यांची सांगलीला बदली झाल्याचं त्यांनी सांगितलं. सांगलीतल्या पोलीस क्वाटर्स मिळाल्या नाहीत म्हणून ते आमच्या घरासमोरील अपार्टमेंट मध्ये राहायला आले होते. मी पुण्यात त्यांची पोस्टिंग कुठं होती ते विचारलं, तर म्हणाले,'येरवडा'

वाचा-प्राजक्ता माळीनं असा घालवला आजी- आजोबांसोबत दिवस, फोटो शेअर करत म्हणाली..

मी तीनेक वर्षांपूर्वी येरवडा जेलमध्ये एक प्रकाशन सोहळा केला होता, त्यामुळं तिथल्या स्टाफशी ओळख झाली होती. मी त्यांना ते सांगितलं. एक दोन नावंही सांगितली. हा एक विलक्षण योगायोग होता. पहाटे सहज लिफ्ट दिलेल्या व्यक्तीकडून त्यांना त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांचा रेफरन्स मिळत होता. तशा गप्पा आणखी खुलल्या. ते म्हणाले, "आमचे येरवड्याचे उपाध्ये सर एकदम भारी होते. त्यांच्या मुळे तिथं चांगले कार्यक्रम व्हायचे. मोठे मोठे स्टार यायचे." ते असं म्हणतात मेंदूत येरवडा आणि संजूबाबाचं समीकरण घोळू लागलं. मी लगेच वाहत्या गंगेत खडा टाकला. त्यांना विचारलं, संजूबाबा होता तेव्हा होता का तुम्ही तिथं?

वाचा-प्राजक्ता माळीनं असा घालवला आजी- आजोबांसोबत दिवस, फोटो शेअर करत म्हणाली..

माणूस कितीही साधा असला तरी त्यांच्या आयुष्यात एखादा किस्सा, घटना, अनुभव असतोच, जो आयुष्याला पुरून उरलेला असतो. त्या अनुभवाच्या जोरावर तो गप्पांचे फड रंगवू शकतो. पोलीस काकांसाठी संजूबाबाचा अनुभव तसाच होता. आणि मग पहाटे साडेचार वाजता बाईकच्या मागच्या सीटवर बसून मला संजूबाबाच्या येरवडा निवासाच दर्शन घडलं.

पोलीस बाबा सुरू झाले, "अहो हिरो बिरो बाहेरच्या माणसासाठी. येरावड्यात आत सगळी माणसं सारखीच. संजू बाबाही तसाच होता. तिथं जे जसं आहे ते त्यानं स्वीकारलेलं. पण एक होतं, तो आम्हाला त्याला रात्री दोन वाजता उठवायला लावायचा. पक्का हनुमान भक्त. पहाटे दोन वाजता हनुमान मंत्र म्हणायला बसायचा ते थेट सकाळी सहा पर्यंत. त्याच्या पूजेत कधी खंड पडला नाही."

"पण त्याच्या खाण्यापिण्याचं काय?" "खण्यापिण्याचही त्याचं काही नव्हतं. पण त्याची एकच निकड होती. तुरुंगातल्या कामाचे महिन्याचे साडे चारशे रुपये प्रत्येक कैद्याला खर्चाला दिले जायचे. कैदी त्यातनं फळं किंवा आणखी काही चांगलं चुंगलं घ्यायचे, पण त्यानं मात्र कधीच फळं किंवा खायचं काही घेतलं नाही."

"मग तो काय करायचा?" "काय नाय. सगळ्या पैश्याच्या सिगरेटी घ्यायचा. सिगरेटी पुरल्या नाहीतर बिड्या पण फुंकायचा. पण तेवढं एकच." इतकं सांगेसांगेतो बस स्टँड आलं होतं. पोलीस काका मला सोडून रस्त्याला लागले होते. आणि पुण्यात पोहोचेतोवर मी येरवड्यात भटकत होते.''

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Sanjay dutt