मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Man Udu Udu zhala Episode Update: दीपूला सानिकाने धक्का दिल्याचं सत्य येणार इंद्रासमोर? काय घडणार मालिकेच्या येत्या भागात?

Man Udu Udu zhala Episode Update: दीपूला सानिकाने धक्का दिल्याचं सत्य येणार इंद्रासमोर? काय घडणार मालिकेच्या येत्या भागात?


Man Udu Udu zhala Episode Update:दीपूला सानिकाने धक्का दिल्याचं सत्य येणार इंद्रासमोर? काय घडणार मालिकेच्या येत्या भागात?

Man Udu Udu zhala Episode Update:दीपूला सानिकाने धक्का दिल्याचं सत्य येणार इंद्रासमोर? काय घडणार मालिकेच्या येत्या भागात?

सानिकानेच धक्का दिल्यामुळे दीपूचा अपघात झाल्याचं सत्य आता इंद्रासमोर येणार कारण दीपूला कोणीतरी धक्का दिल्याचा संशय इंद्राच्या मनात आला आहे. काय घडणार मालिकेच्या येत्या भागात जाणून घ्या. (Man Udu Udu zhala Episode Update)

मुंबई, 26 मे:  'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu zhal)  मालिकेला सध्या भावनिक वळण आलं आहे. लाडक्या दीपूचा अपघात झाल्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. सानिकाला घरी परत येण्यासाठी बोलावायला गेलेल्या दीपूला सानिका धक्के मारुन घरातून बाहेर काढते आणि दीपू रस्त्यावरुन येणाऱ्या कारला धडकते. तिच्या डोक्याला जबर मार लागतो. दीपूला जखमी अवस्थेत पाहून सानिका देखील घाबरते आणि तिच्या अपघाताचं सत्य सर्वांपासून लपवून ठेवते. परंतू सत्य जास्त काळ लपून राहत नाही. सानिकानेच धक्का दिल्यामुळे दीपूचा अपघात झाल्याचं सत्य आता इंद्रासमोर येणार आहे.

मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यात सानिका आणि इंद्रा समोरा समोर आले असून इंद्रा सानिकाची खोलात चौकशी करताना दिसत आहे. प्रोमोत दाखवण्याच आलं आहे की, सानिका हॉस्पिटलमध्ये दीपूच्या वॉर्डमध्ये जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. निप्चित पडलेल्या दीपूला सानिका 'तुझा अपघात कसा झालं हे कोणालाही सांगू नकोस' असं बजावते. सानिका बाहेर येताच तिला इंद्रा आणि देशपांडे सर भेटतात तेव्हा इंद्रा सानिकाला 'अपघात नेमका कसा झाला हे एकदा नीट सांगशील का?' असं म्हणतो. तेव्हा सानिका त्याला 'दीपू माझ्याशी भांडून घराबाहेर गेली आणि ती गाडीने उडवलं', असं खोटं सांगते. सानिकाच्या सांगण्यावर इंद्राला विश्वास बसत नाही. 'दीपिका मॅडम अशा रस्त्याच्या मध्ये का उभ्या राहतील? त्यांना कोणी तरी धक्का दिला असेल', असा संशय इंद्रा सत्तूकडे व्यक्त करतो.

दीपूच्या या अवस्थेला सानिकाच जबाबदार आहे हे सत्य सगळ्यांसमोर येणार का? असा प्रश्न प्रोमो पाहून सर्वांना पडला आहे.  खरंतर दीपूचा अपघात होतो त्यादिवशी सानिका आणि कार्तिक बोलत असताना त्यांचं बोलणं मुक्ता ऐकते.

हेही वाचा - 45 डिग्री तापमानत शुट झालं गाणं, 'उडून ये फुलपाखरा' गाण्याचा BTS VIDEO व्हायरल

मीच दीपूला धक्का दिल्याने तिचा अपघात झाल्याचं ती सांगत असते. आता हे कोणाला कळलं तर काय होऊल. त्यावर कार्तिक त्याला 'हे फक्त आपल्या दोघात राहिल, मी तुझा नवरा आहे मी कोणाला सांगणार नाही', असं म्हणतो. दोघांच हे बोलणं ऐकून मुक्ता मोठा धक्का बसतो.

आता इंद्राच्या मनात आलेला संशय खरा होणार का? मुक्ता इंद्राला दीपूच्या अपघाताविषयी सांगेल का? असा प्रश्न समोर येतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी मन उडू उडू झालं मालिकेच्या या आठवड्यातील भाग पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial