जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sandeep Pathak: 'म्हणून अधून मधून इन्स्टाग्रावर पोस्ट टाकत असतो'; संदीप पाठकनं सांगितलं कारण

Sandeep Pathak: 'म्हणून अधून मधून इन्स्टाग्रावर पोस्ट टाकत असतो'; संदीप पाठकनं सांगितलं कारण

Sandeep Pathak: 'म्हणून अधून मधून इन्स्टाग्रावर पोस्ट टाकत असतो'; संदीप पाठकनं सांगितलं कारण

आपल्या उत्तम अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता संदीप पाठक सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. संदीप सोशल मीडियावर पोस्ट का टाकतो याचं एक मजेशीर कारण त्यानं सांगितलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जुलै:  सध्या सोशल मीडिया हे कलाकारांसह सगळ्यांच्या जिवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. तुमचे विचार तसंच तुम्हाला व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हक्काचा प्लॅटफॉर्म बनला आहे. कलाकार आपल्या दररोजच्या आयुष्यातील त्यांच्या कामाविषयीचे अपडेट सोशल मीडियाद्वारे  त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. कलाकार खास करुन सोशल मीडियावर सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. असाच एक अभिनेता म्हणजे संदीप पाठक. आपल्या उत्तम अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता संदीप पाठक सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. अनेक रिल्स, फोटो, व्हिडीओ संदीप सोशल मीडियावर शेअर करत असतो. कधी कधी तो फोटो पोस्ट करायलाही विसरतो मात्र अधून मधून फोटो टाकावाच लागतो असं संदीप म्हणतोय. त्यामागे एक खास कारण आहे. संदीपनं त्याच्या नव्या सोशल मीडिया पोस्टमधून त्याचं मजेशीर कारण त्याच्या चाहत्यांना सांगितल आहे. संदीप पाठकचे रिल्स त्याच्या इन्स्टाग्राम रिल्स कायम सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. कधी कामाच्या गडबडीत सोशल मीडियावर पोस्ट करायला मिळत नाही. यावर संदीप पाठकनं म्हटलंय, ‘अधून मधून फोटू टाकावा लागतो इन्ष्टावर, ‘शास्त्र असतं ते’. संदीपनं दिलेल्या या मजेशीर कारणानं चाहत्यांना खळखळून हसवलं आहे. अनेकांनी संदीपच्या पोस्टवर कमेंट्स करत ‘लाफ्टर इमोजी’ पोस्ट केल्या आहेत. काहींनी, ‘भारी, कसं सुचतय राव हे?’ असा प्रश्नही संदीपला विचारला आहे.

जाहिरात

हेही वाचा - Koffee With Karan 7:महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवंडांसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या सारा-जान्हवी? नाव वाचून बसेल धक्का ‘शास्त्र असतं ते’, हा डायलॉग सोशल मीडियावर कायम सक्रीय असलेल्या नेटकऱ्यांसाठी नवीन नाही. भाडीपा आई आणि मी या धम्माल सेगमेंटमधला हा धम्माल डायलॉग आहे. तरुण मंडळींमध्ये तर शास्त्र असतं ते हा डायलॉग तुफान व्हायरल झाला आहे. अभिनेता संदीप पाठकच्या वक्र फ्रंट विषयी सांगायचं झालं तर संदीपचा नुकताच ‘वाय’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. अभिनेत्री मुक्ता, प्राजक्ता माळींसह संदीप पाठकनं सिनेमात जबरदस्त भूमिका साकारली आहे. बीडमधील स्त्रीभ्रूण हत्येच्या सत्य घटनेवर आधारित वाय हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंती उतरला आहे. मराठीतील पहिला हायपरलिंक सिनेमा म्हणून वाय या सिनेमावर शिक्का मोर्तब झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात