...अन् चक्क अभिनेत्रीनं घेतली, सलमानच्या मागोमाग आलेल्या कुत्र्याची मुलाखत

...अन् चक्क अभिनेत्रीनं घेतली, सलमानच्या मागोमाग आलेल्या कुत्र्याची मुलाखत

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ही अभिनेत्री चक्क एका कुत्र्याची मुलाखत घेताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : आयफा अवॉर्ड 2019 (IIFA Awards 2019) बॉलिवूड कलाकरांच्या स्टायलिश अंदाज आणि लुक्ससाठी चर्चेत राहिला. ग्रीन कार्पेटवर आपण इतरांपेक्षा सुंदर आणि वेगळ दिसावं असा या अवॉर्ड फंक्शनला पोहोचणाऱ्या प्रत्येकचा प्रयत्न असतो. दरवर्षी भारताबाहेर होणारा हा अवॉर्ड सोहळा यंदा मुंबईमध्येच पार पडला. आयफानं यंदा 20 वर्ष पूर्ण केली. त्यानिमित्त भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या ठिकाणी अनेक गंमतीशीर घटना घडल्या. सध्या IIFA मधील एक व्हिडीओ सगळीकडे खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक अभिनेत्री चक्क एका कुत्र्याची मुलाखत घेताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी IIFA अवॉर्डमध्ये एक कुत्रा सलमान खानच्या मागे लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सलमान खान या संपूर्ण कार्यक्रमात त्याच्या खास दबंग अंदाजात दिसला. या अवॉर्ड फंक्शनला सलमाननं महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरसोबत हजेरी लावली होती. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या.

असं काय झालं की, Bigg Boss 13 च्या इव्हेंटमध्ये फोटोग्राफरवर भडकला सलमान

 

View this post on Instagram

 

Every dog has his day this was his time to shine and he knew #SalmanKhan is a big animal lover ❤

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सलमाननं जाताना पुन्हा एकदा कॅमेऱ्याला पोझ दिली आणि तो निघाला. मात्र या सर्वात एक कुत्रा सुद्धा त्यांच्या मागे मागे जात असताना कॅमेऱ्यात कैद झाला. काही वेळातच त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी हा व्हिडीओ गंमत म्हणून शेअर केला, तर काहींनी मात्र या ठिकाणच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले होते.

अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन झाली आई, शेअर केला बाळाचा पहिला फोटो

या सर्व प्रकारानंतर टीव्ही अभिनेत्री अदिती भाटियानं त्या कुत्र्याची मुलाखत घेतली. अदितीनं हा गंमतीशीर व्हिडीओ तिच्या सोसल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अदिती एखाद्या अँकरप्रमाणं त्या कुत्र्याशी बोलताना दिसत आहे. जसं की तो एखादा सेलिब्रेटी आहे. त्याला ती नॉमिनेशबद्दल प्रश्न विचारताना दिसते. हा कुत्रा सुद्धा शांतपणे तिला प्रतिसाद देत राहतो. तो तिच्याशी वारंवार शेकहँड करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Spread love! 🐶❤️

A post shared by Aditi Bhatia 🎭 (@aditi_bhatia4) on

हा व्हिडीओ शेअर करताना अदितीनं त्याला Spread Love असं कॅप्शन दिलं आहे. अदितीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओवर अनेक गंमतीशीर कमेंट पाहायला मिळत आहेत. एका युजरनं म्हटलं, पुढे राहिला तर गाडीच्या खाली येईल त्यामुळे तो सलमानच्या मागे चालत आहे स्मार्ट डॉग. अदितीच्या अँकरिंगमध्ये अडथळा न आणल्यानं या कुत्र्याचं सगळीकडे कौतुक होत आहे.

Sacred Games च्या अभिनेत्रीने सांगितला 'कास्टिंग काउच'चा धक्कादायक अनुभव

=======================================================================

स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO

Published by: Megha Jethe
First published: September 24, 2019, 12:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading