टीव्हीवरील सर्वाधिक वादात राहणारा शो बिग बॉसचा 13 वा सीझन लवकरच प्रेक्षाकांच्या भेटीला येत आहे. या सीझनबाबत प्रेक्षाकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
बिग बॉसच्या 13 व्या सीझनचा लॉन्च इव्हेंट नुकताच मुंबईमध्ये पार पडला. त्यानंतर बिग बॉसच्या नव्या घराचे फोटो समोर आले आहेत. हे या घराचं भव्य प्रवेशव्दार आहे.
यावेळी बिग बॉसच्या घरात सेलिब्रेटी पॅटर्न पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हे घर यंदा अनोख्या थीमवर सजवण्यात आलं आहे. घरातील हॉलमध्ये अशाप्रकारे सजवट करण्यात आली आहे.
बिग बॉस 13 सेट यंदा फिल्मसीटीला तयार करण्यात आला आहे. घरातील डायनिंग रुम अशाप्रकारे सजवण्यात आली आहे. याशिवाय इथल्या भिंतींवर प्राण्यांची चित्रही दिसत आहेत.
बेडरुमच्या बाहेरचा पॅसेज काहीसा असा आहे. तसेच छताला बुद्धिबळाच्या सोंगट्या लावून हटके लूक देण्यात आला आहे.
बिग बॉसच्या घरातील हे ते ठिकाण आहे. ज्याठिकाणी स्पर्धकांमध्ये गॉसिप होतात. हा घरातील बेडरुम. या ठिकाणीसुद्धा अशाप्रकारे अनोख्या पद्धतीची सजावट करण्यात आली आहे.
बिग बॉसच्या 13 सीझनचं हे घर म्युझियम थीमवर आधारित आहे. घरातील ही अनोखी सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.