मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'बायकोकडे लक्ष दे' म्हणणाऱ्या Trollers ला रितेश देशमुखने दिलं सडेतोड उत्तर

'बायकोकडे लक्ष दे' म्हणणाऱ्या Trollers ला रितेश देशमुखने दिलं सडेतोड उत्तर

नुकताच अरबाज खानच्या 'पिंच २' चा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सहभागी झालेले दिसून येत आहेत.

नुकताच अरबाज खानच्या 'पिंच २' चा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सहभागी झालेले दिसून येत आहेत.

नुकताच अरबाज खानच्या 'पिंच २' चा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सहभागी झालेले दिसून येत आहेत.

मुंबई, 29 सप्टेंबर- अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) नेहमीच आपल्या कुल अंदाजात दिसून येतो. तो कधीच ट्रोलिंगकडे लक्ष नाही देत. तो आपल्याला सतत हसत-खेळत दिसून येतो. मात्र जेव्हा गरज पडते तेव्हा तो ट्रोलर्सला चपराक द्यायला मागे पुढे पाहात नाही. रितेश खूपच शांत स्वभावाचा आहे. त्याला फारच क्वचित वेळा राग येतो. अन्यथा तो नेहमी आपल्या विनोदीवृत्तीमध्येच दिसून येतो. मात्र नुकताच रितेशने आपल्या नेहमीच्या कुल अंदाजात ट्रोलर्सला (Trollers) उत्तर दिल आहे. एका ट्रोलर्सने रितेशला आपल्या पत्नीवर देण्याचा सल्ला दिला होता. यावर रितेशसोबतच जेनेलियानेही(Genelia DSouza) उत्तर दिलं आहे.

" isDesktop="true" id="610480" >

अभिनेता अरबाज खान 'पिंच' हा शो होस्ट करतो. यामध्ये अनेक कलाकार सहभागी होतात. तसेच त्यांच्या खाजगी आयुष्यातील विविध गोष्टींचे खुलासे करतात. सध्या 'पिंच २' सुरु आहे. यामध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख सहभागी झाले होते. दरम्यान अरबाज खानने रितेशला दाखवलं की कशा पद्धतीने सोशल मीडियावर युजर्स त्याला आणि त्याच्या पत्नीला ट्रोलसुद्धा करतात. अरबाजने रितेश दाखवलं कि एका ट्रोलर्सने त्याच्यासाठी लिहिलं होतं, त्याला आपल्या पत्नीकडे जास्त लक्ष द्यायची गरज आहे. यावर रितेश देशमुख पोट धरून हसू लागला. तसेच उत्तर देत ट्रोलर्सला म्हणाला 'मलाही वाटतं तुम्ही तुमच्या पत्नीवर जास्त लक्ष द्यायला हवं माझ्या पत्नीवर नाही'.

(हे वाचा:Bigg Boss 15: रिया चक्रवर्तीची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री? स्टुडिओबाहेर...)

नुकताच अरबाज खानच्या 'पिंच २' चा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सहभागी झालेले दिसून येत आहेत. तसेच प्रोमोमध्ये अरबाज खान रितेश आणि जेनेलियाला ट्रोलर्सचे ट्रोल वाचून दाखवत आहे. यावेळी एका युजरने जेनेलियावरही निशाणा साधला होता. जेनेलियाला ट्रोल करत लिहिलं होतं. 'ओव्हरऍक्टिंग करणारी,चीप व्हलगर आंटी' म्हटलं होत. तसेच प्रत्येकवेळी ओव्हरऍक्टिंग करत असते. असंही म्हटलं होतं. यावर उत्तर देत जेनेलियाने म्हटलं आहे, 'वाटतं यांच्या घरी यांच्यासोबत काही चांगलं होत नाहीय. अपेक्षा करते की भावा तू ठीक-ठाक असशील. दरम्यान अरबाज खानने रितेश आणि जेनेलियाला त्या क्षणाची आठवणही काढून दिली जेव्हा रितेश एका शोदरम्यान प्रीती झिंटाच्या हातावर किस करत होता.

(हे वाचा:रणबीरच्या वाढदिवसाला अर्जुन कपूरने आलियाकडे केली खास विनंती; पोस्ट होतेय VIRAL)

जेनेलिया आणि रितेश देशमुख बॉलिवूडमधील एक गोड जोडपं म्हणून ओळखलं जातं. हे दोघेही नेहमीच एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. तसेच जेनेलिया आणि रितेश सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. दोघेही नेहमीच विविध फोटो आणि रिल्स शेअर करत असतात. त्यांच्या चाहत्यांना त्यांचा हा अंदाज खूप आवडतो. प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. मात्र काहीवेळा या कलाकरांना ट्रोलर्सचा सामनाही करावा लागतो. रितेश आणि जेनेलिया यांनी २०१२ मध्ये लग्न केलं होतं. या दोघांची पहिली भेट त्यांच्या 'तुझे मेरी कसम' या आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर झाली होती. आज या दोघां २ मुले आहेत.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Riteish Deshmukh