**मुंबई, 2 सप्टेंबर :**महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे समीर चौगुलेंनी प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण केले आहे.विनोदांचं अचूक टाईमिंग साधत हास्यजत्रेच्या स्टेजवर नुसता धुमाकूळ घालणारे प्रसिध्द अभिनेते म्हणजेच समीर चौगुले होय. समीर हे एक उत्कृष्ट लेखकसुध्दा आहेत. छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमे, नाटक आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर यांनी रसिकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. ‘फू बाई फू’, कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमांमधून समीर चौगुले हे नाव घराघरांत पोहचलं. आता महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या हदयात स्थान मिळवलं. आता समीर चौघुले याना चाहत्यांकडून एक खास गिफ्ट मिळालं आहे. समीर चौघुले सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत नेहमी कनेक्टेड राहतात. आता त्यांच्या चाहत्याने एक खास गिफ्ट देऊन समीर यांचं मन जिंकलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या गिफ्टविषयी माहिती दिली आहे. समीरच्या चाहत्याने त्यांची हुबेहूब रांगोळी काढली आहे. या रांगोळीमध्ये त्यांनी समीर चौघुले यांच्या शेजारी विनोदवीर चार्ली चॅप्लिन यांची देखील रांगोळी काढली आहे. या रांगोळीत या कलाकाराने समीर चौघुले याना चार्ली चॅप्लिनच्या रूपात काढलं आहे.
मदन कावळे या चाहत्याने ही रांगोळी साकारत समीर चौघुले याना चार्ली चॅप्लिनचा दर्जा दिला आहे. ही रांगोळी पाहून समीर चौघुले भावुक झाले आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवर या रांगोळीचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय कि, ‘चाहत्यांचे प्रेम हीच खरी ऊर्जा असते..गोरेगाव येथे रांगोळी प्रदर्शनात श्री. मदन कावळे यांनी माझी अतिशय सुंदर रांगोळी काढली…मनापासून आभार आणि प्रेम.’ ही रांगोळी पाहून समीर यांचे चाहते देखील खुश झालेत. त्यांनी या पोस्टवर कमेंट करत या रांगोळी काढणाऱ्या कलाकाराचे कौतुक केले आहे. हेही वाचा - Deepika Padukon : दीपिका पादुकोण-रश्मिका मंदाना एकाच चित्रपटात, चाहत्यांना ‘मेगा ब्लॉकबस्टर’ सरप्राईज या पोस्टवर चाहत्यांनी, ‘तू आमचा चार्ली चॅप्लिनच आहेस’, ‘तू कमाल आहेस’, ‘आम्हाला तुझा अभिमान वाटतोय’ अशा कमेंट केल्या आहेत. या रांगोळीची आता सगळीकडेच चर्चा होत आहे. अभिनेते समीर चौगुले हे आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा त्याची चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे पडद्यावर वावरणारा हा कलाकार खऱ्या आयुष्यातही अत्यंत साधा आहे. त्यामुळे त्यांच्या याच साधेपणामुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.