जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Deepika Padukon : दीपिका पादुकोण-रश्मिका मंदाना एकाच चित्रपटात, चाहत्यांना 'मेगा ब्लॉकबस्टर' सरप्राईज

Deepika Padukon : दीपिका पादुकोण-रश्मिका मंदाना एकाच चित्रपटात, चाहत्यांना 'मेगा ब्लॉकबस्टर' सरप्राईज

Deepika padukon

Deepika padukon

दीपिका पदुकोण नवीन भूमिकेत दिसणार आहे. नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 2  सप्टेंबर : बॉलिवूडबद्दल सध्या सगळीकडे नकारात्मक वातावरण असताना नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे.  बॉलिवूडचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा ट्रेलर ४ सप्टेंबर  प्रदर्शित होणार असून  नुकताच या चित्रपटातील मुख्य कलाकारांचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला आहे. ‘मेगा ब्लॉकबस्टर’ या चित्रपटाची चाहते पहिल्या दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात बॉलिवूडशी दुसऱ्या क्षेत्रातील बडे स्टार्सदेखील दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटाबद्दल एक छान सरप्राईज चाहत्यांना मिळालं आहे. बॉलिवूडची क्वीन दीपिका पदुकोण या चित्रपटातून झळकणार आहे. ‘मेगा ब्लॉकबस्टर’ चित्रपटात विविध बडे स्टार्स दिसणार आहेत. प्रसिद्ध क्रिकेटर रोहित शर्मा या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणार आहे. तर नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदान्ना या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यासोबतच कॉमेडियन कपिल शर्मा देखील या चित्रपटात दिसणार आहे. यांच्याबद्दल पहिल्यापासूनच माहिती होती. परंतु, आता दीपिका पदुकोण देखील या चित्रपटात झळकणार आहे. तिने ‘सरप्राईज’ असे  म्हणत तिच्या सोशल मीडियावरून या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे.

    जाहिरात

    दीपिका यापूर्वी ‘गेहराईयां’ या चित्रपटातून दिसली होती. तसेच मध्यंतरी ‘८३’ या चित्रपटात देखील झळकली होती. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमाई करू शकले नव्हते. त्यामुळे या चिरपटाकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. हेही वाचा - Karan Johar : बॉलिवूडच्या बॉयकॉट संस्कृतीवर भडकला करण जोहर; म्हणाला … रश्मिका मंदान्ना ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिका मंदान्नाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये ती मनमोहक शैलीत दिसत आहे. हा लूक शेअर करताना रश्मिका मंदान्नाने कॅप्शनमध्ये लिहिले, “मजेची गोष्ट”.कॉमेडियन कपिल शर्माने ‘मेगा ब्लॉकबस्टर’ चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हे पोस्टर त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे, ज्यावर चाहते कमेंट करत आहेत आणि त्याच्या लूकचे कौतुक करत आहेत. या चित्रपटातील आपला लूक शेअर करताना रोहित शर्माने आपल्या बॉलिवूडमधील एंट्रीची माहिती दिली आहे. त्याच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधले असून तो सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ‘मेगा ब्लॉकबस्टर’ या चित्रपटात अनेक  स्टार्स एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. रश्मिका मंदान्ना, रोहित शर्मा आणि कपिल शर्मा हे तिन्ही कलाकार या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी या तिघांचेही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट चाहत्यांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करणार हे नक्की.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात