मुंबई 16 जुलै**:** करोना विषाणूच्या (coronavirus) वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन उद्योग पूर्णपणे ठप्प पडला आहे. अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. निर्मात्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अर्थव्यवस्थेचं थांबलेलं चाक पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी काही निर्मात्यांनी OTT प्लॅटफॉर्मचा रस्ता निवडला. त्यांनी आपले चित्रपट नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार या वेब प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास सुरुवात केले. मात्र रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांचे बिकट दिवस अद्याप संपलेले नाहीत. (Marathi Play) अशा लोकांसाठी तरी नाटकं सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी लेखक-दिग्दर्शक समीर विद्वांस (Sameer Vidwans) याने केली आहे. तारक मेहता फेम अभिनेत्रीचं 19 व्या वर्षी झालं होतं लैंगिक शोषण; सांगितला धक्कादायक अनुभव महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत समीरनं रंगभूमीच्या सद्य परिस्थितीवर भाष्य केलं. “तक्रार करून करून कंटाळा आलाय किंवा खरं तर आता हसू झालंय. वर्षभराहून जास्त काळ इतर व्यवसायांप्रमाणे नाटक-सिनेमांचंही कंबरडं मोडलंय! सर्व जण आर्थिक झळ सोसत शांत बसून आहेत. पण, हे वारंवार होणारे राजकीय कार्यक्रम मात्र थांबत नाहीत.” असं म्हणत त्याने रंगभूमी सुरु करण्याची मागणी केली आहे. कलाकारांच्या मागणीमुळे सोशल मीडियावर सध्या #रंगभूमीसुरूकरा हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. राखी सावंतने का केलं नाही लग्न? सांगितलं थक्क करणारं कारण… आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8535 नवे रुग्ण आढळले असून 6013 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 156 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्याचा मृत्युदर 2.04 टक्के एवढा नोंदवला गेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण मात्र सुधारत असून राज्याचा रिकव्हरी रेट हा 96.02 टक्के एवढा नोंदवला गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.