Home /News /entertainment /

तारक मेहता फेम अभिनेत्रीचं 19 व्या वर्षी झालं होतं लैंगिक शोषण; सांगितला धक्कादायक अनुभव

तारक मेहता फेम अभिनेत्रीचं 19 व्या वर्षी झालं होतं लैंगिक शोषण; सांगितला धक्कादायक अनुभव

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण वयाच्या 19 व्या वर्षी तिचं लैंगिक शोषण देखील करण्यात आलं होतं. (sexual harassment) पाहा नेमकं काय घडलं होतं त्यावेळी...

    मुंबई 16 जुलै: आराधना शर्मा (Aradhana Sharma) ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘स्प्लिट्सविला’ (Splitsvilla) या रिअलिटी शोमधून नावारुपास आलेली आराधना आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती यशाच्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंतु तिचा इथपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण वयाच्या 19 व्या वर्षी तिचं लैंगिक शोषण देखील करण्यात आलं होतं. (sexual harassment) पाहा नेमकं काय घडलं होतं त्यावेळी... ग्लॅमरस खलनायिका; पाहा मोनालिसाचं Bold फोटोशूट आराधना सध्या तारक मेहता उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय विनोदी मालिकेत झळकताना दिसतेय. यामध्ये तिने साकारलेल्या डिटेक्टिव्हच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. या भूमिकेच्या निमित्तानं टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आराधनानं हा थक्क करणारा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “ही घटना मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यावेळी 19 वर्षाची होते. पुण्यात शिक्षण घेत असताना मी डॉडलिंग देखील करत होते. मुंबईतील एक व्यक्ती एका प्रोजेक्टसाठी कास्टिंग करत असल्याचं मला कळालं. मात्र त्याला आणखी काही रोल कास्ट करायचे असल्याने आम्ही रांचीतील माझ्या मूळ गावी भेटलो. आम्ही स्क्रिप्ट वाचत होतो आणि त्याने मला विचित्रपणे स्पर्श करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मला काही कळलं नाही. पण नंतर त्याचा इरादा माझ्या लक्षात आला. परिणामी मी त्याला धक्का दिला. आणि तेथुन पळून गेले. तो अनुभव आठवून आजही मला रडू येतं.” राखी सावंतने का केलं नाही लग्न? सांगितलं थक्क करणारं कारण... पुढे ती म्हणाली, “खरं तर मी त्याला जाब विचारणार होते. परंतु कुटुंबीयांनी मला थांबवलं.” करिअरची सुरुवात झाली तेव्हा आराधना थोडी जाड होती त्यामुळे बॉडिशेमिंगचा अनुभव देखील तिला आहे. परंतु नंतर तिने योग्य डाएट आणि व्यायाम करून आपलं अतिरिक्त वजन कमी केलं. सध्या ती सर्वाधिक ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून चर्चेत असते.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Sexual harassment, Taarak mehta ka ooltah chashma, Tv actress

    पुढील बातम्या