मुंबई, 20 जुलै : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या मायोसायटिस या ऑटो इम्युन विकाराशी लढा देत आहे. आपल्याला हा विकार झाल्याचं निदान झाल्याचं समंथाने ऑक्टोबर 2022मध्ये जाहीर केलं होतं. आरोग्याच्या या समस्येमुळे समंथा रुथ प्रभू अभिनय क्षेत्रात एक वर्षाचा ब्रेक घेणार असल्याचं वृत्त अनेक माध्यमांनी दिलं आहे. ते वृत्त कळताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘सिटाडेल इंडिया’ सीरिज आणि ‘कुशी’ या प्रोजेक्ट्सचं शूटिंग संपल्यानंतर कोणताही नवा तेलुगू, तमिळ आणि बॉलिवूड सिनेमा साइन करायचा नाही, असा निर्णय समंथाने घेतल्याचं समजतं. तसंच, तिने काही प्रोजेक्ट्ससाठी अॅडव्हान्स म्हणून घेतलेली रक्कमही निर्मात्यांना परत केल्याचं समजतं. त्यामुळे समंथाचं या काळात मोठं आर्थिक नुकसान होणार असल्याचा दावा आंध्रा डॉट कॉम या वेबसाइटने केला आहे.
या वेबसाइटच्या वृत्तात असं म्हटलं आहे, की समंथा एका फिल्मसाठी सर्वसाधारणपणे साडेतीन ते चार कोटी रुपये मानधन घेते. तिने अलीकडेच तीन चित्रपट साइन केले होते. त्यावरून असा अंदाज बांधता येतो, की तिचं 10 ते 12 कोटी रुपयांचं संभाव्य नुकसान होणार आहे. ‘हिंदू धर्माचा अपमान केला तर…’ नितेश तिवारीच्या रामायण चित्रपटावर प्रसिद्ध अभिनेत्यानं व्यक्त केला संताप ‘सिटाडेल इंडिया’ प्रोजेक्टचं शूटिंग संपलं, तेव्हा समंथाने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने ब्रेक घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. ‘… आणि ‘सिटाडेल इंडिया’चं शूटिंग संपलं. आपल्यासमोर काय येणार आहे याची कल्पना असेल तर ब्रेक घेणं काही वाईट गोष्ट नाही,’ असं त्या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे. फिल्ममेकर द्वयी राज अँड डीके, तसंच सीता मेनन यांना समंथाने या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. तसंच, ‘या कुटुंबाची मला गरज होती, याची मला कल्पनाच नव्हती,’ असं समंथाने या तिघांना उद्देशून लिहिलं आहे. ‘प्रत्येक लढाई लढण्यासाठी मला मदत केल्याबद्दल आणि मला एकटं न सोडल्याबद्दल खूप धन्यवाद. इतर कशाहीपेक्षा तुम्हाला अभिमान वाटेल असं काम माझ्या हातून घडो अशी माझी इच्छा आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्यासाठी पुढचं काही लिहीत नाही, तोपर्यंत कारकिर्दीतला सर्वोत्तम रोल दिल्याबद्दल खूप आभार,’ असं समंथाने पोस्टमध्ये लिहिलं आहे. तसंच, या तिघांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ‘कुशी’ सप्टेंबरमध्ये रिलीज होणार असून, ‘सिटाडेल इंडिया’ सीरिज कधी रिलीज होणार याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. ‘कुशी’मध्ये समंथा विजय देवरकोंडासह झळकणार असून, राज अँड डीकेच्या ‘सिटाडेल इंडिया’ सीरिजमध्ये तिच्यासह वरुण धवन आहे.

)







