जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'हिंदू धर्माचा अपमान केला तर...' नितेश तिवारीच्या रामायण चित्रपटावर प्रसिद्ध अभिनेत्यानं व्यक्त केला संताप

'हिंदू धर्माचा अपमान केला तर...' नितेश तिवारीच्या रामायण चित्रपटावर प्रसिद्ध अभिनेत्यानं व्यक्त केला संताप

रामायण

रामायण

‘रामायण’चे शूटिंग डिसेंबर 2023 मध्ये सुरू होणार आहे. आलिया भट्ट ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे. तर रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यापूर्वी बॉलिवूडच्या एका अभिनेत्यानं या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20  जुलै : ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ वादात अडकल्यानंतर आणि बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर, चित्रपट निर्माते नितेश तिवारी ‘रामायण’ वर चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत.  दंगलचे दिग्दर्शक नितीश तिवारी लवकरच ‘रामायण’ हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. अनेक दिवसांपासून या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती. ‘रामायण’चे शूटिंग डिसेंबर 2023 मध्ये सुरू होणार आहे. आलिया भट्ट ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे. तर रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यापूर्वी बॉलिवूडच्या एका अभिनेत्यानं या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. ‘आदिपुरुष’  पाहिल्यानंतर नितेश तिवारींचा ‘रामायण’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट दिसणार असल्याची चर्चा आहे. सगळ्यांनाच या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ओम राऊत यांच्याप्रमाणे नितेश तिवारीही त्यांच्या आशा मोडणार नाहीत, अशी आशा चाहत्यांना वाटत असतानाच, अनेकजण याला विरोधही करत आहेत. नितेश तिवारीच्या चित्रपटाभोवती सुरू असलेल्या चर्चा दरम्यान, अभिनेता अन्नू कपूरने आता रामायणावर चित्रपट बनवण्याच्या चित्रपट निर्मात्याच्या कल्पनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नितेश तिवारींना चांगलंच फटकारलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आज तकला दिलेल्या मुलाखतीत, अन्नू कपूर यांना नितेश तिवारी रामायणावर चित्रपट बनवत असल्याचे सांगण्यात आले तेव्हा अभिनेता चांगलाच भडकला. अन्नू कपूर यांनी नितेश तिवारीला फटकारलं. यावेळी बोलताना अन्नू कपूर म्हणाले, ‘कोण आहे नितेश तिवारी? कशामुळं त्यांचे चित्रपट  प्रसिद्ध होतात? हिंदू धर्माचा अपमान करता का? जे असं करतील त्यांना बुटाने मारहाण केली जाईल. या अस्थिर परिस्थितीत कोणीही कोणत्याही धर्माचा अपमान करू नये. अशा विश्लेषणाची ही वेळ नाही. समाज त्या पातळीवर पोहोचलेला नाही. तुमच्याकडे धर्मावर भाष्य करण्याचा तर्कसंगत दृष्टिकोन नाही.’ असं म्हणत अन्नू कपूर यांनी संताप व्यक्त केला आहे. Sankarshan Karhade : ‘तिघेही वेगळ्या पक्षाचे पण…’ महाराष्ट्रातील सद्य राजकीय स्थितीवर संकर्षण कऱ्हाडेचं भाष्य चर्चेत ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ रिलीज होण्यापूर्वीच नितेश तिवारी यांनी ‘रामायण’वर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. पण प्रदर्शित झाल्यानंतर ‘आदिपुरुष’ला ज्या प्रकारचा विरोध झाला, त्यावरून हा चित्रपट बनवावा की नाही या दोन बाजूंनी सर्वजण विभागले गेले आहेत. नुकतेच जेव्हा नितेशला विचारण्यात आले की, तुम्हाला वादांची चिंता आहे का? तर यावर उत्तर देताना चित्रपट निर्मात्याने, ‘मला खात्री आहे की त्यांचा चित्रपट प्रेक्षकांना नाराज करणार नाही.’ असं उत्तर दिलं होतं. अन्नू कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेता शेवटचा ‘क्रॅश कोर्स’मध्ये दिसला होता. हे प्राइम व्हिडिओवर प्रसिद्ध झाले. यानंतर अन्नू कपूर आता आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेसोबत ‘ड्रीम गर्ल 2’मध्ये दिसणार आहे. अभिनेत्याकडे ‘सब मोह माया है’ आणि ‘हम दो हमारे बारह’ देखील आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात