मुंबई, 10 जुलै : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रूथ प्रभूचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान ती तिच्या कामातून ब्रेक घेत असल्याचं म्हटलं जात आहे. मागील काही महिन्यांपासून तिनं एकही सिनेमा साइन केलेला नाही. समांथा तिच्या प्रकृती स्वास्थामुळे सध्या चिंतेत आहे. तिच्या प्रकृतीबाबत सगळे अपडेट ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना देत असते. पण मोठ्या पडद्यावरून ब्रेक घेणार असल्याचं कळताच चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण यामागचं कारणं देखील तितकंच गंभीर असल्याचं समोर येत आहे. समांथानं नुकतीच एक पोस्ट शेअर केली ज्यात तिनं तिच्या प्रकृतीबाबत खुलासा केला आहे. समांथा सोशल मीडियावर सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओ ती सातत्यानं शेअर करत असते. तिच्या ‘खुशी’ सिनेमाचे अपडेट्स ती सध्या शेअर करताना दिसतेय. अभिनेता विजय देवरकोंडाबरोबर समांथा स्क्रिन शेअर करणार आहे. 1 सप्टेंबरला 2023ला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या सिनेमानंतर समांथा काही महिने किंवा किमान वर्षभर कोणत्याच माध्यमातून प्रेक्षकांना दिसणार नाहीये असं सांगण्यात येत आहे. हेही वाचा -
‘आदिपुरुष’ मधील कुंभकर्णचं वजन आहे तब्बल 140 Kg अन् दररोज खातो 20 पोळ्या, कोण आहे ‘हा’ अभिनेता
अभिनेत्री समांथानं नुकतेच काही सिनेमे कॅन्सल केल्याची माहिती समोर आलीये. समांथाने एक सिनेमा साइन केला होता. त्याचं अँडवान्स मानधन देखील घेतलं होतं. मात्र ते परत केलं असून सिनेमा नाकारला आहे. समांथा तिच्या प्रकृतीबाबत खूपच चिंतेत असून सध्या फार कठीण काळाचा सामना करत आहे.
नुकतीच तिनं एक पोस्ट शेअर केला. “मागील सहा महिने फार कठीण गेलेत”, असं तिनं त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. फोटोमध्ये समांथाचे डोळे अश्रूंनी भरलेली दिसत आहेत. कितीही कठीण प्रसंग आला तरी हार मानायची नाही अशी जिद्द डोळ्यात दिसत आहे. समांथाच्या या फोटोनंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. समांथा कामातून पूर्णपणे ब्रेक घेत असून तिच्या प्रकृतीकडे ती पूर्णपणे फोकस करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. समांथा एक वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा कोणत्या सिनेमातून रिएंट्री करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे तिचा खुशी या सिनेमासाठी देखील चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.