मुंबई, 2 मे : सध्या कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वजण सोशल मीडियावर अधिकच सक्रिय झाले आहेत आणि यामुळेच सध्या बॉलिवूड सेलिब्रेटींचे थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या रायचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात तिनं भारतीय संस्कृतीची खिल्ली उडवणाऱ्यांची क्षणात बोलती बंद केल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिचं खूप कौतुक केलं जात आहे. काही वर्षांपूर्वी ऐश्वर्यांनं एका इंटरनॅशनल चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. हा शो डेव्हिड लेटरमॅन होस्ट करत होते. या शोमध्ये त्यांनी ऐश्वर्याला विचारलं की हे खरं आहे का की, तू तुझ्या आई-वडिलांसोबत राहते. याला ऐश्वर्यानं होकार दिला. यावर तिची खिल्ली उडवताना लेटरमॅन म्हणले, भारतात मोठं झाल्यावरही आई-वडीलांसोबत राहणं ही सामान्य गोष्ट आहे का? लेटरमॅन यांच्या या प्रश्नावर तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले. कारण त्यांना माहित होतं की याठिकाणी ऐश्वर्याची आणि भारतीय संस्कृतीची खिल्ली उडवली जात आहे. प्रियांका चोप्राचं 2014 मध्येच झालं होतं लग्न? काय आहे Viral Photoचं सत्य
लेटरमॅन यांच्या प्रश्नावर काही वेळ विचार करुन ऐश्वर्या म्हणाली, हो भारतात मोठं झाल्यावरही आपल्या आई-वडिलांसोबत राहाणं खूप सामान्य गोष्ट आहे आणि ते चांगलं सुद्धा आहे कारण आम्हाला डिनरला आपल्याच आई-वडिलांना भेटण्यासाठी त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही. ऐश्वर्याच्या या एका उत्तरावर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचीच बोलती बंद झाली आणि सर्वांना टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं. ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून तिच्या हजरजबाबीपणाचं खूप कौतुक केलं जात आहे. ऋषी कपूर यांच्या आठवणीत भावुक झाल्या पत्नी नीतू, Photo शेअर करुन म्हणाल्या… ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती शेवटची फत्ते खान या सिनेमात दिसली होती. लवकरच ती मेलफिसेंट: मिस्ट्रेस ऑफ एविलच्या हिंदी वर्जनमध्ये एंजेलिना जॉलीच्या जागी दिसणार आहे. या सिनेमात तिनं एंजेलिनासारखाच लुक केला आहे. याशिवाय ती मणिरत्नम यांच्या आगामी सिनेमात दिसणार असल्याचं बोललं जात आहे. शूट संपलं की इरफानला खावी वाटायची पाणी पुरी, मुलानं शेअर केला थ्रोबॅक VIDEO