'रामायण' आणि 'महाभारता'नंतर दूरदर्शन दाखवणार गाजलेल्या आणखी दोन धार्मिक मालिका

'रामायण' आणि 'महाभारता'नंतर दूरदर्शन दाखवणार गाजलेल्या आणखी दोन धार्मिक मालिका

रामायण मालिकेने तर सर्वच रेकॉर्ड मोडले असून तब्बल 7.7 कोटी लोकांनी पाहिलेली ही मालिका जगात नंबर वन ठरली आहे.

  • Share this:

मुंबई 02 मे: लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या ऐकेकाळी गाजलेल्या मालिका पुन्हा दाखविण्यात आल्या. अनेक वर्षानंतरही या मालिकांची लोकप्रियता कायम असल्याचं दिसून आलंय. या दोनही मालिकांना जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दूरदर्शन टीआरपीच्या आकड्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर गेलं आहे. लोकांचा हा प्रतिसाद पाहून दूरदर्शनने आणखी दोन मालिका पुन्हा दाखविण्याचा निर्णय घेतला असून ‘विष्णू पुराण’ आणि ‘श्री कृष्णा’ या सिरियल्स पुन्हा दाखविण्यात येणार आहेत.

रवी चोपडा यांनी दिग्दर्शित केलेली ‘विष्णू पुराण’ ही मालिका लवकरच ‘डीडी भारती’ या चॅनलवर दाखविली जाणार असल्याची माहिती दुरदर्शनने आपल्या ट्वीटरवर दिली आहे. त्याची वेळ आणि तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तर ‘श्री कृष्णा’ही मालिका उद्यापासून म्हणजे 3 मेपासून दाखविली जाणार आहे. रात्री 9 वाजता ही मालिका दाखविली जाणार आहे.

रामायण मालिकेने तर सर्वच रेकॉर्ड मोडले असून तब्बल 7.7 कोटी लोकांनी ही मालिका पाहिली असून जगात मनोरंजन विश्वात सर्वात जास्त प्रेक्षकसंख्या असलेली ती मालिका ठरली आहे.

हे वाचा - 29 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी केला होता 'सीता' दीपिका यांच्यासाठी प्रचार!

सध्या टीव्हीवर रामायणानंतर उत्तर रामायण टेलिकास्ट होत आहे आणि सर्वांनाच माहित आहे की रामायणात कुशची भूमिका मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीनं साकारली होती. नुकतच स्वप्नीलनं त्याच्या आणि रामानंद सागर यांच्या पहिल्या भेटीबद्दलचा अनुभव शेअर केला.

स्वप्नील त्याचं युट्यूब चॅनल पिल्लू टीव्हीवर त्याच्या 'रामायण' शूटिंगच्या वेळचे किस्से शेअर करत आहे. नुकताच त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्यानं त्याच्या आणि रामानंद सागर याच्या पहिल्या भेटीचा अनुभव शेअर केला आहे. स्वप्नील पहिल्यांदा रामानंद सागर यांना मढ आयर्लंडवर भेटला होता. ज्यावेळी आजूबाजूला काय चाललं आहे आणि स्वतः रामानंद सागर कोण आहेत हे सुद्धा त्याला माहित नव्हतं. मात्र त्याच्या वडीलांना मात्र या भेटीनंतर एवढं भरून आलं की त्यांनी त्याला या भेटीनंतर आइसक्रिम खाऊ घातलं होतं.

स्वप्नील जोशीनं वयाच्या 9 व्या वर्षी उत्तर रामायणात काम केलं होतं आणि यात त्यानं कुशची भूमिका साकारली होती. मात्र त्यावेळी देशभरातून अनेक मुलांच्या ऑडिशन घेण्यात आल्या होत्या त्यामुळे हे स्वप्नीलसाठी कठीण काम होतं. सध्या डीडी नॅशनलवर उत्तर रामायण सुरू आहे. ज्यातील स्वप्नीलच्या त्यावेळच्या अभिनयाचं आजही कौतुक केलं जात आहे.

First published: May 2, 2020, 4:55 PM IST

ताज्या बातम्या